मोठमोठे हॉटेल्स, आलिशान घर! सेलिब्रिटी शेफ संजीव कपूरची एकूण संपत्ती पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 12:40 PM2022-03-03T12:40:44+5:302022-03-03T12:43:32+5:30
Sanjeev kapoor: छोट्या पडद्यावरील 'खाना खजाना' या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. केवळ ते खवैय्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत तर ते लोकप्रियदेखील झाले.
संजीव कपूर (Sanjeev kapoor) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. देशातील आघाडीच्या सेलिब्रिटी शेफमध्ये त्यांचं नाव कायम अग्रस्थानी घेतलं जातं. छोट्या पडद्यावरील 'खाना खजाना' या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. केवळ ते खवैय्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत तर ते लोकप्रियदेखील झाले. विशेष म्हणजे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत लोकप्रिय असलेल्या या शेफची एकूण संपत्ती किती असेल किंवा त्यांचं वार्षिक उत्पन्न कशा स्वरुपाचं असेल असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडतात. त्यामुळेच संजीव कपूर यांचं मासिक, वार्षिक उत्पन्न किती, कोणकोणत्या माध्यमातून ते कमाई करतात हे जाणून घेऊयात.
संजीव कपूर हे मूळचे हरियाणातील कुरालू येथील आहे. त्यांनी नवी दिल्लीतील इंस्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग अँड न्युट्रीशन येथून हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली. विशेष म्हणजे संजीव कपूर यांची एकूण व्यावसायिक संपत्ती १०० कोटींच्या आसपास असल्याचं सांगण्यात येतं.
'या' माध्यमातून करतात संजीव कपूर कमाई
संजीव कपूर यांचं वार्षिक उत्पन्न २५ कोटी रुपये आहे. संजीव कपूर यांचं येलो चिली नावाचं रेस्तराँ आहे. या येलो चिलीच्या अनेक ब्रँचेस आहेत. तसंच ते रेस्तराँ व्यतिरिक्त अन्य काही माध्यमातूनही कमाई करतात. यात टीव्ही शोचं सूत्रसंचालन, नावाजलेल्या ब्रँडच्या जाहिराती, त्यांनी लिहिलेली पुस्तक यांमधून त्यांची कमाई होते.
संजीव कपूर यांची एकूण संपत्ती किती?
संजीव कपूर यांचं नेटवर्थ १४०$ मिलिअन इतकी आहे. थोडक्यात भारतीय चलनानुसार, १०० कोटी रुपये. संजीव कपूर यांचं मासिक वेतन २.५ कोटी रुपये असून वार्षिक वेतन २५ कोटींपेक्षा जास्त आहे.
दरम्यान, भारतासह अमेरिकेमध्येही त्यांची अनेक रेस्तराँ आहेत. त्यातून ते जवळपास २०० कोटी रुपये कमवतात. तसंच त्यांनी पाककलेची अनेक पुस्तके लिहिली आहेत. इतकंच नाही तर ते एरिअल, डेटॉल, दावत बासमती तांदूळ, स्लीक किचन या ब्रँडसाठीही काम करतात. या जाहिरातींसाठी ते ३० ते ४० लाख रुपये मानधन घेतात. विशेष म्हणजे फूड फूड हे त्यांचं स्वत:चं चॅनेलदेखील आहे. या चॅनलमधून ते वर्षाकाठी ५० कोटींची कमाई करतात.