'या' प्रसिद्ध सेलिब्रिटींनी बॉलिवूड नव्हे तर हॉलीवूडमधून केली फिल्मी करिअरला सुरुवात !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 07:59 AM2018-04-30T07:59:47+5:302018-04-30T13:35:06+5:30
-रवींद्र मोरे नशिब खूपच अप्रतिक गोष्ट आहे, ज्याचे नशिब चांगले नसते त्याला खूपच हुशारी असूनही चागंल्या संधी मिळत नाहीत ...
नशिब खूपच अप्रतिक गोष्ट आहे, ज्याचे नशिब चांगले नसते त्याला खूपच हुशारी असूनही चागंल्या संधी मिळत नाहीत आणि ज्याचे नशिब चांगले असते, त्याला अशा संध्या मिळतात ज्यासाठी जगभरातील बरेच लोक तिव्रतेने वाट पाहतात. भारतात जेव्हा एखादा अॅक्टर आपल्या करिअर सुरुवात करतो तर तो मुंबईकडे धाव घेतो आणि बॉलिवूड पोहचतो. मात्र बॉलिवूडमध्ये यश मिळणे न मिळणे नशिबाची गोष्ट आहे. पण असेही काही लकी अॅक्टर्स आहेत, ज्यांना बॉलिवूडच्या अगोदर विदेशी चित्रपटात संधी मिळाली. आज अशाच भारतीय अॅक्टर्सच्या बाबतीत जाणून घेऊया ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात विदेशी चित्रपटातून केली आहे.
* सुरज शर्मा
दिल्लीमध्ये जन्मलेल्या आणि तेथिलच प्रसिद्ध सेंट स्टीफेन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या सुरजचे नशिब तेव्हा चमकले जेव्हा हॉलिवूड डायरेक्टर आंग ली आपल्या ‘लाइफ आॅफ पाय’ या चित्रपटासाठी अॅक्टर्सची शोधाशोध करण्यासाठी भारतात आला. सुरजने या चित्रपटासाठी आॅडिशन दिले आणि सुमारे ३ हजार लोकांना मागे टाकत त्याने हा रोल मिळविला. या चित्रपटासाठी सुरजला खूप अवॉर्डदेखील मिळाले. विशेष म्हणजे त्याला त्यानंतर बऱ्याच विदेशी चित्रपटात काम करण्याची पुन्हा संधी मिळाली. त्याने बॉलिवूडमध्ये फक्त ‘फिल्लौरी’ या एकाच चित्रपटात काम केले आहे.
* फ्रीडा पिंटो
मुंबईमध्ये जन्मलेल्या आणि तिथेच मॉडलिंग करणारी फ्रीडाने सहा मुलींसोबत ब्रिटिश डायरेक्टर डॅनी बॉयलचा ‘स्लमडॉग मिलियनेयर’ साठी आॅडिशन दिले आणि तिला या चित्रपटात ‘लतिका’चा लीड रोल मिळाला. या चित्रपटाने आॅस्कर अवॉर्ड जिंकले आणि फ्रीडाचे नशिबच पुर्णत: पालटले. फ्रीडाचे नशिब असे चमकले की, तिला अनेक हॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि आतापर्यंत तिने एकाही बॉलिवूडपटात काम केले नाही.
* गौरव चोप्रा
इंडियन टीव्हीचा प्रसिद्ध चेहरा गौरव चोप्राने २००६ मध्ये रिलीज झालेल्या ‘ब्लड डायमंड’ या हॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात लियोनार्डो डी कॅपरियोची मुख्य भूमिका होती आणि बऱ्याच दिग्गज स्टार्सनी या चित्रपटात काम केले होते. मात्र गौरवने आतापर्यंत एकाही बॉलिवूड चित्रपटात काम केले नाही.
* रोशन सेठ
रोशन सेठ यांचा जन्म पटना, बिहार मध्ये झाला असून लंडनमध्ये थिएटरची ट्रेनिंग घेतली आणि ब्रिटिश चित्रपट ‘जगरनॉट’ मध्ये अभिनयाची संधी मिळाली. त्यानंतर रोशन यांनी बऱ्याच मोठ्या ब्रिटिश आणि हॉलिवूड चित्रपटात काम केले. शिवाय रिजर्ड एटनबर्गचा प्रसिद्ध ‘गांधी’ चित्रपटात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना प्रतिष्ठित बाफ्टा अवॉर्ड्स मध्ये नॉमिनेटदेखील करण्यात आले होते.
* इरफान खान
आज संपूर्ण जगाला इरफान खानचा परिचय आहे आणि फक्त बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपल्या अॅक्टिंग स्किलमुळे प्रशंसा मिळवत आहे. मात्र बऱ्याच कमी लोकांना हे माहित आहे की, इरफानच्या चित्रपट करिअरची सुरुवात एक इंडो-कॅनेडियन चित्रपट ‘सच अ लॉन्ग जर्नी’ पासून झाली आहे. मात्र इरफानला ब्रिटिश फिल्म ‘द वारियर’ पासून जास्त प्रसिद्धी मिळाली, त्यांनतर दर्शकांनी त्याच्या टॅलेंटला ओळखले.
* वृजेश हिरजी
वृजेशला आज बॉलिवूड चित्रपटांचा प्रत्येक दर्शक ओळखतो आणि त्याला कॉमेडी रोल्समध्ये खूपच पसंत केले जाते. मात्र त्याने आपल्या करिअरची सुरुवात इंडो-कॅनेडियन चित्रपट ‘सच अ लॉन्ग जर्नी’ पासून केली होती. हा चित्रपट १९९८ मध्ये रिलीज झाला होता आणि त्यानंतर बऱ्याच काळानंतर त्याला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली.