चित्रपटातील क्रिकेट मैदानावर सेलेब्सचा 'सिक्सर' !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 06:53 AM2018-04-09T06:53:47+5:302018-04-09T12:23:47+5:30
-रवींद्र मोरे नुकताच क्रिकेट आयपीएलचा धुमधडाका सुरु झाला असून क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच आहे. जगभरातील चाहते क्रिकेटच्या प्रेमापोटी काहीही ...
नुकताच क्रिकेट आयपीएलचा धुमधडाका सुरु झाला असून क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच आहे. जगभरातील चाहते क्रिकेटच्या प्रेमापोटी काहीही करण्यास सज्ज असतात. क्रिकेटवरील हेच प्रेम बॉलिवूडने हेरले आणि क्रिकेटवर आधारित चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे या चित्रपटांना बॉक्स आॅफिसवरदेखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज आपण अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया ज्या चित्रपटांतील क्रिकेट मैदानावर स्टार्सनी चौकार, षटकार मारुन दर्शकांचे मनोरंजन केले आहे.
* लगान
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आमिर खान स्टारर 'लगान' हा चित्रपट क्रिकेटवर आधारित बनलेल्या चित्रपटांपैकी सर्वात यशस्वी चित्रपट होय. या चित्रपटात शेतकरी आपल्या शेतावरील कर माफ होण्यासाठी इंग्रजांविरुद्ध क्रि केटचा सामना खेळतात. आमिरच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची टीम कशाप्रकारे इंग्रजांना पराजय करते आणि शेतीचा कर माफ करण्यासाठीचा शेतकºयांचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट आॅस्करसाठीही नॉमिनेट करण्यात आला होता.
* जन्नत
क्रिकेट सामन्यांदरम्यान होणाºया सट्टेबाजीवर आधारित बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली होती. यशराज फिल्मच्या बॅनरमध्ये बनलेल्या चित्रपटाने क्रिकेट मागील एक सत्य दाखविले होते. चित्रपटातील गाणेदेखील दर्शकांना खूपच आवडली होती शिवाय इमरान हाशमीने अतिशय उत्कृष्टपणे मुख्य भूमिका साकारुन दर्शकांची दाद मिळविली होती.
* एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी
नीरज पांडे दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आयुष्यावर आधारित होय. २०१६ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात धोनीची भूमिका अभिनेता सुशांत सिंह राजपूतने साकारली होती. शिवाय कियारा आडवाणी, दिशा पाटनी, अनुपम खेर, भूमिका चावला मुख्य भूमिका मध्ये दिसले होते. या चित्रपटात धोनीशी जुडलेले कित्येक रहस्य दर्शकांसमोर ठेवण्यात आले होते. दर्शकांना हा चित्रपट खूपच आवडला होता.
* इकबाल
एका गरीब कर्णबधीर मुलाची क्रिकेट बद्दलची उत्सुकता आणि देशासाठी खेळण्याची त्याची जिद्द दर्शवणारा हा चित्रपट सर्वाेत्कृष्ट चित्रपट होय. नागेश कुकुनूर दिग्दर्शित इकबाल या चित्रपटात कर्णबधीर मुलीची भूमिका श्रेयस तळपदेने साकारली होती. विशेष म्हणजे हा चित्रपट त्याचा बॉलिवूड डेब्यू होय. शिवाय या चित्रपटात क्रिकेट कोचची भूमिका नसिरुद्दीन शाहने साकारुन दर्शकांचे चांगलेच मनोरंजन केले होते.
* अजहर
भारतीय क्रिकेट टीमचा वंडर बॉय म्हणून प्रसिद्धी मिळविलेल्या मोहम्मद अजहरूद्दीनच्या आयुष्यावर आधारित बनलेल्या या चित्रपटानंतर क्रिकेटरांच्या आयुष्यावर चित्रपट बनविण्याचा ट्रेंड सुरु झाला. या चित्रपटात मोहम्मद अजहरूद्दीनचे क्रिकेट करिअर आणि फिक्सिंगच्या आरोपानंतर त्यांनी केलेला सामना दाखविण्यात आला आहे.