बेबी बम्पचा फोटो शेअर करून सेलिना जेटलीने ओढवून घेतला वाद! ट्रोलर्सचा हल्लाबोल!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2017 06:07 AM2017-09-03T06:07:07+5:302017-09-03T11:37:07+5:30
बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीचे बेबी बम्पचे अनेक फोटो आपण आत्तापर्यंत पाहिलेत. पण सध्या तिने शेअर केलेला बेबी बम्पच्या एका अशाच फोटोने मात्र वाद निर्माण केला आहे.
ब लिवूड अभिनेत्री सेलिना जेटली लवकरच आई होणार आहे. सध्या सेलिना आॅस्ट्रियात आहे आणि बेबी मून एन्जॉय करतेय. सेलिनाचे बेबी बम्पचे अनेक फोटो आपण आत्तापर्यंत पाहिलेत. पण सध्या तिने शेअर केलेला बेबी बम्पच्या एका अशाच फोटोने मात्र वाद निर्माण केला आहे.
या फोटोत सेलिना बाथटबमध्ये दिसतेय. फोटोत तिचे बेबी बम्प स्पष्ट दिसतेय. हा फोटो शेअर करताना सेलिनाने एक लांबलचक संदेशही लिहिला आहे. ‘प्रेग्नंसीशी संबंधित निगेटीव्ह बॉडी इमेजपासून स्वत:ला स्वतंत्र करणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून मी माझा हा फोटो शेअर करण्याचा निर्णय घेतला. लोक प्रेग्नंट बॉडीसंदर्भात निगेटीव्ह इमेज ठेवतात. महिलांनी स्वत:च्या शरिराची लाज नाही तर अभिमान बाळगला हवा आणि प्रेग्नंसीदरम्यान होणा-या बदलांचे स्वागत करायला हवे,’ असे सेलिनाने लिहिले आहे.
सेलिनाने दिलेला संदेश जगभरातील महिलांसाठी आहे.काहींना तिचा हा संदेश रूचला पण अनेकांना तो तितकाच खटकला. असे फोटो शेअर करताना सेलिना, तुला लाज वाटायला हवी, इथपर्यंत काही नेटिजन्सनी तिच्यावर टीका केली.
सेलिनाने शेअर केलेला हा बेबी बम्पचा फोटो आणि तिने दिलेला संदेश मूर्खपणाशिवाय काहीही नाही. बेबी बम्प दाखवून स्वत:चे न्यूड फोटो शेअर करून लोक काय सांगू इच्छितात. हे सगळे शरीर झाकून पण सांगता येते, असे गौरव नावाच्या एका युजरने म्हटले आहे.
अनिल राऊत या युजरने सेलिनावर टीका केली आहे. असे फोटो पोस्ट करण्याची गरजच काय? तुम्ही पे्रग्नंट आहात तर स्वत:ची काळजी घ्या, असे त्याने म्हटले आहे.
ALSO READ : सेलिना जेटलीने शेअर केला बिकनीतील बेबी बम्पचा फोटो!
अर्थात काहींनी सेलिनाला पूर्ण पाठींबाही दिला आहे. आधी सेलिनाने जे लिहिलेय, ते शांतपणे वाचा आणि मग स्वत:ची मते द्या. तिने एक सकारात्मक संदेश दिला आहे, असे रोहन नावाच्या युजरने म्हटले आहे.