सेन्सॉर अन् ‘बाबूमोशाय बंदूकबाज’च्या निर्मात्यांमध्ये जुंपली; म्हटले ‘महिला असून असा चित्रपट काढला?’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 11:53 AM2017-08-02T11:53:35+5:302017-08-02T17:23:35+5:30

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील तब्बल ४८ सीन्सला कात्री ...

Censor and 'Babukoshi gunman' makers jumped; Said, "Is there a woman who has a movie?" | सेन्सॉर अन् ‘बाबूमोशाय बंदूकबाज’च्या निर्मात्यांमध्ये जुंपली; म्हटले ‘महिला असून असा चित्रपट काढला?’

सेन्सॉर अन् ‘बाबूमोशाय बंदूकबाज’च्या निर्मात्यांमध्ये जुंपली; म्हटले ‘महिला असून असा चित्रपट काढला?’

googlenewsNext
िनेता नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील तब्बल ४८ सीन्सला कात्री लावण्याचे ठरविल्याने या चित्रपटाचे निर्माते आणि बोर्ड यांच्यात चांगलेच घमासान रंगण्याची चिन्हे आहेत. तत्पूर्वी चित्रपटाच्या निर्मात्या किरण श्रॉफ यांनी सेन्सॉरवर आरोपांची बरसात करण्यास सुरुवात केली असून, सेन्सॉरने अपमानित केल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

एका लीडिंग वृत्तपत्राशी बोलताना किरण यांनी आरोप केला की, जेव्हा आम्ही सर्टिफिकेशनकरिता चित्रपट बोर्डाकडे सबमिट केला, तेव्हा कमिटीने चित्रपटाला ‘ए’ रेटिंग दिले. स्क्रीनिंगनंतर तब्बल तासभर बोर्ड आणि निर्मात्यांमध्ये इंटरनॅशनल डिस्कशन सुरू होते. त्यानंतर त्यांनी चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट देण्याचे ठरविले. त्याचबरोबर त्यांनी ४८ सीन्सवर हरकत घेताना ते एडिट करण्यास सांगितले. त्यावेळी आम्ही त्यांना विचारले की, जर चित्रपट एडल्ट्ससाठी आहे तर त्यामध्ये एवढे कट कशासाठी? आमच्या या प्रश्नावर बोर्डाने सीन्सला कात्री लावण्याबाबतचे लॉजिक समजावून सांगितले. अर्थातच हे लॉजिक वायफळ असल्याचे किरण यांनी म्हटले. 



पुुढे बोलताना किरण यांनी म्हटले की, मी जेव्हा माझे म्हणणे मांडत होती, तेव्हा कमिटीमधील एका महिला मेंबरने माझ्याकडे इशारा करताना म्हटले की, ‘तू एक महिला असताना अशाप्रकारचे चित्रपट बनवू कशी शकतेस?’ मी काही बोलणार तेवढ्यातच कमिटीतील एका सदस्याने त्या महिला सदस्याला शांत करीत म्हटले की, अहो ती काय महिला आहे काय? पहा तिने कपडे कसे परिधान केले आहेत. हे ऐकून मी शॉक्ड झाली. कारण मी जे कपडे परिधान केले होते, तेच कपडे कमिटीतील त्या महिलेनेही परिधान केले होते. मग ती महिला नाही काय? कमिटीतील सदस्यांचे बोल ऐकून मी दंग राहिले आणि एक शब्दही न बोलता बाहेर आले. जर हे लोक मला माझ्या कपड्यांवरून न्यायनिवाडा करत असतील तर, माझ्या चित्रपटाला ग्रीन सिग्नल देताना त्यांचे काय पॅरामीटर्स असू शकतात याची मी कल्पना करू शकते, असेही किरण यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, किरण यांच्या आरोपावर सेन्सॉरकडून कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण आलेले नाही; मात्र आता ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाप्रमाणेच ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटाचाही वाद पेटण्याची शक्यता आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून सेन्सॉर बोर्डाकडून अतिशय ताठर भूमिका घेतली जात असल्याने निर्मात्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. विशेषत: बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पदावर अनेकांचा आक्षेप आहे.  

Web Title: Censor and 'Babukoshi gunman' makers jumped; Said, "Is there a woman who has a movie?"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.