सेन्सॉर बोर्डाची कात्री : ‘बार बार देखो’; ‘ब्रा’ मत देखो!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2016 12:10 PM2016-08-28T12:10:42+5:302016-08-28T17:47:22+5:30
बॉलिवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांच्या आगामी ‘बार बार देखो’या चित्रपटातील अनेक दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवली ...
ब लिवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांच्या आगामी ‘बार बार देखो’या चित्रपटातील अनेक दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवली आहे. बोर्डाने चित्रपटास युए प्रमाणपत्र दिले आहे, तेही चित्रपटातील अनेक महत्त्वपूर्ण दृश्ये कापल्यानंतर. सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाचा ‘बार बार देखो’च्या दिग्दर्शिक नित्या मेहरा यांनी तीव्र विरोध केला आहे. ‘बार बार देखो’मध्ये वुमेन लॉन्जरीवर आधारित अर्थात महिला अंतर्वस्त्राबद्दलचे एक दृश्य होते. शिवाय एका संवादात सविता भाभी(कॉमिक बुकमधील एक पॉर्न कॅरेक्टर)चा उल्लेख होता. सेन्सॉर बोर्डाने हा सीन व सविता भाभीबद्दलचा संवाद दोन्ही चित्रपटातून काढून टाकलेत. नित्या मेहरा यांनी याला तीव्र विरोध नोंदवला. महिलांच्या अंतर्वस्त्रांबाबत बोलणे निषिद्ध आहे, अशा व्हिक्टोरियन युगात आपण जगतो आहोत का? अनेक वर्षांपूर्वी १९९५ मध्ये शाहरूख खाने काजोलसोबत एक ब्रा सीन शूट केला होता. तेव्हा आपत्ती नव्हती. मग आत्ताच का? ‘अ फ्लार्इंग जट’मध्ये टायगर पॉर्न रेफरन्ससाठी सनी लिओनीचे नाव घेताना दिसतो. मग आम्ही सविता भाभीचे नाव घेतले तर त्यात बिघडले काय?,असे सवाल त्यांनी केले. ‘फ्रीकी अली’ या आगामी चित्रपटातही नवाजुद्दीन सिद्दीकी हा पुरूषांची अंतर्वस्त्रे विकणारा दाखवले आहे. म्हणजे, पुरूषांचे ईनर वियर स्क्रीनवर दाखवणे योग्य व महिलांचे चुकीचे, असे आपण मानायचे का? असा परखड सवालही त्यांनी केला. ‘बार बार देखो’ एका महिलेने दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. त्यामुळे अंतर्वस्त्रांच्या सीनद्वारे लोक उत्तेजित होतील, ही शक्यता शून्य आहे,असा युक्तिवादही त्यांनी केला.