'चुपडी चुपडी चाची' म्हणत कमल हासनसोबत झळकणारी 'ही' छोटी मुलगी आज बॉलिवूडमध्ये कमावतेय नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 13:34 IST2024-11-26T13:33:48+5:302024-11-26T13:34:09+5:30
'चाची ४२०'मध्ये झळकलेली ही छोटी मुलगी आज बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून चर्चेत आहे

'चुपडी चुपडी चाची' म्हणत कमल हासनसोबत झळकणारी 'ही' छोटी मुलगी आज बॉलिवूडमध्ये कमावतेय नाव
कमल हासन यांचे अनेक सिनेमे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. कमल हासन यांचा असाच एक सिनेमा सर्वांचा लाडका सिनेमा आहे. या सिनेमाचं नाव 'चाची ४२०'. कमल हासन, तब्बू, परेश रावल, अमरिश पुरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या हा सिनेमा आजही टीव्हीवर लागला की लोक आवडीने हा सिनेमा पाहतात. कमल हासन यांच्या सिनेमात झळकलेल्या छोट्या मुलीचंही खूप कौतुक झालं. ही छोटी मुलगी आज मोठी अभिनेत्री झाली असून बॉलिवूडमध्ये नाव कमावतेय. तुम्ही ओळखलं का या मुलीला?
कमल हासनसोबत झळकणारी ही छोटी मुलगी आज अभिनेत्री
कमल हासनसोबत 'चुपडी चुपडी चाची' म्हणणाऱ्या या छोट्या मुलीची खूप चर्चा झाली. या छोट्या मुलीचं नाव आहे फातिमा सना शेख. हो तुम्ही बरोबर ऐकताय. फातिमाने बालकलाकार म्हणून अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. फातिमाने मोठी झाल्यावर आमिर खानच्या 'दंगल' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पुढे 'लुडो', 'थार', 'थग्ज ऑफ हिंदुस्तान' अशा सिनेमांमध्ये फातिमा झळकली होती. फातिमाच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं.
फातिमाने साकारलेली इंदिरा गांधींची भूमिका गाजली
फातिमाने आज स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव कमावलंय. २०२३ ला आलेल्या 'सॅम बहादुर' सिनेमात फातिमाने इंदिरा गांधींची भूमिका साकारली. फातिमाच्या या भूमिकेला तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली. याशिवाय 'सूरज पर मंगल भारी' आणि 'धक धक' अशा वेगळ्या धाटणीच्या सिनेमातही फातिमाने काम केलं. फातिमा लवकरच अनुराग बासूच्या आगामी 'मेट्रो इन दिनो' या सिनेमात झळकणार आहे.