'चक दे इंडिया' गर्ल्स.. 8 वर्षांनंतर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:10 AM2016-01-16T01:10:27+5:302016-02-10T11:36:55+5:30

 8 वर्षांनंतर आज त्या अभिनेत्री कुठे आहेत, काय करीत आहेत याची उत्सुकता अनेकांच्या मनात कायम आहे. चित्रांशी रावत : ...

'Chak de India' girls .. 8 years later | 'चक दे इंडिया' गर्ल्स.. 8 वर्षांनंतर

'चक दे इंडिया' गर्ल्स.. 8 वर्षांनंतर

googlenewsNext
 8
वर्षांनंतर आज त्या अभिनेत्री कुठे आहेत, काय करीत आहेत याची उत्सुकता अनेकांच्या मनात कायम आहे.
चित्रांशी रावत : 'चक दे'मध्ये लहानशी दिसणारी पण तितकिच अँग्रेसिव्ह असलेली हरयाणवी कोमल चौटाला ही भूमिका चित्रांशी रावत हिने साकारली होती. ती आता खूपच सुंदर दिसते. तिने लक व फॅशन या चित्रपटातून भूमिका केल्या असून ती टीव्हीवर देखील सक्रिय आहे.

अनिथा नायर : सुपर बोल्ड आलिया बोस आठवत असेल तर अनिथा नायर नक्कीच तुमच्या डोळय़ासमोर येईल. चक दे नंतरही तिने अनेक चित्रपटातून भूमिका साकारल्या. अनेक टीव्ही कार्यक्रम देखील केले. आता तिने लग्न केले असून ती एका मुलाचीआई आहे.

ताण्या अग्रेल : गरम डोक्याची व घाड धिप्पाड असलेली. बलबीर कौर अनेकांच्या आजही लक्षात आहे. ताण्या अग्रेल या युवतीने ती भूमिका साकारली होती. आता ती ग्लॅम इंडस्ट्रीमध्ये सेटल झाली आहे. अनेक टीव्ही मालिकात ती दिसते. सीआयडी मालिकेत ती भूमिका करीत आहे.

शिल्पा शुक्ला : या चित्रपटात बिंदिया नायक ग्रे शेड भूमिका साकारणारी शिल्पा शुक्ला चांगलीअभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी तिची प्रमुख भूमिका असलेला बीए पास हा चित्रपट आला होता या चित्रपटात तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.

शुभी मेहता : गुंजन लखानी सकारणारी अभिनेत्री शुभी मेहता मुळात 'रोडिज' या कार्यक्रमात प्रतिस्पर्धी होती. या चित्रपटासाठी तिने रोडिजमधून काढता पाय घेतला. आता ती अँक्टीव्ह असून पीआर कंसल्टंट म्हणून काम करीत आहे.

सागरिका घाटगे : ग्लॅमरस व तितकिच अँग्रेसिव्ह असलेली प्रिती सभरवालची भूमिका सागरिका घाटगे या अभिनेत्रीने साकारली होती. तेव्हापासूनच ती चित्रपटात सातत्याने काम करीत आहे. अनेक मराठी सिनेमातून तिने काम केले असून 'खतरो के खिलाडी' या रियालिटी शोमध्ये ती सहभागी होती.

सीमा आझमी : नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून ग्रॅज्युएट झालेल्या सीमाने राणी डिस्पोट्टा या झारखंडच्या मुलीची भूमिका केली होती. यानंतर तिने वॉटर व आरक्षण या चित्रपट अभिनय केला. तिचे काही चित्रपटच लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

विद्या मालवडे : वूमन्स हॉकी टीमची कर्णधार असलेली विद्याची भूमिका ही या चित्रपटातील सर्वांत मॅच्युअर भूमिका होती. विद्याने अनेक चित्रपटातून सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले आहे. ती यशस्वी अभिनेत्री आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.
cnxoldfiles/strong> : दक्षिण भारतीय नेत्रा रेड्डी साकारणारी सँडियाने पुढे चित्रपटात काम करण्याकडे फारसे लक्ष केंद्रित केलेच नाही.

Web Title: 'Chak de India' girls .. 8 years later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.