आदित्य रॉय कपूर म्हणतोय मी आहे सिंगल... पण त्याचे मित्र म्हणतायेत खोटं बोलू नकोस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 04:56 PM2019-03-26T16:56:04+5:302019-03-26T16:56:54+5:30
आदित्य अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये कार्यरत असला तरी तो इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नव्हता. पण त्याने काहीच महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचे अकाऊंट सुरू केले आहे.
आदित्य रॉय कपूरने सलमान खान आणि अजय देवगणच्या लंडन ड्रीम्स या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो अॅक्शन रिप्ले, गुजारिश यांसारख्या चित्रपटात झळकला. या त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता आशिकी 2 या चित्रपटाने मिळवून दिली. या चित्रपटात त्याने साकारलेली गायकाची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.
आता तो लवकरच प्रेक्षकांना कलंक या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबतच वरुण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातील त्याची भूमिका आणि लूक खूपच वेगळा आहे.
आदित्य रॉय कपूर गेली अनेक वर्षं बॉलिवूडचा भाग असून त्याचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. आदित्य अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये कार्यरत असला तरी तो इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नव्हता. पण त्याने काहीच महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचे अकाऊंट सुरू केले आहे. तो त्याच्या सहकलाकारांसोबतचे, चित्रीकरणाच्या दरम्यानचे, हॉलिडेजचे फोटो इन्स्टाग्रामवर आवर्जून पोस्ट करत असतो. त्यामुळे केवळ काहीच दिवसांत त्याला नऊ लाखांहून अधिक लोक इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहेत.
आदित्यने नुकत्याच पोस्ट केलेल्या एका फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. आदित्यने पोस्ट केलेल्या या फोटोत त्याच्या टी-शर्टवर सिंगल असे लिहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचसोबत द सिंगल लाईफ हा त्याने हॅशटॅग दिला आहे. या त्याच्या फोटोला अनेक प्रतिक्रिया त्याचे चाहते देत आहे. तू सिंगल असशील तर आम्ही तुझ्यासोबत मिंगल व्हायला तयार आहोत असे देखील त्याच्या महिला फॅन्स त्याला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. पण या सगळ्यात अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि अर्जून कपूर यांचे कमेंट्स लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कारण परिणीतीने अ लाय म्हणजेच हे खोटे आहे असे म्हटले आहे तर अर्जुनने चल झुठा म्हणत आपल्या मित्राची टर उडवली आहे.