"रात्री अडीच वाजता ए.आर.रहमान आल्यावर.."; 'चमकीला' मधील 'विदा करो' गाणं कसं रेकॉर्ड झालं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 12:36 PM2024-05-06T12:36:00+5:302024-05-06T12:36:23+5:30
'चमकीला' सिनेमातलं सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारं 'विदा करो' गाण्याच्या रेकॉर्डींगमागचा भन्नाट किस्सा वाचाच (chamkila, vida karo)
'चमकीला' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सिनेमा रिलीज होऊन एक महिना उलटला असला तरीही लोकं सिनेमावर भरभरुन प्रेम करत आहेत. दिलजीत दोसांज आणि परिणीती चोप्राच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक होतंय. 'चमकीला' सिनेमा सुपरहिट होण्यामागे मोठा वाटा आहे तो म्हणजे सिनेमांच्या गाण्यांचा. सिनेमातील 'विदा करो' गाणं सध्या चांगलंच गाजतंय. लोकांच्या काळजाचा ठाव हे गाणं घेतंय. हे गाणं रेकॉर्ड कसं झालं? याचा खास किस्सा दिग्दर्शक इम्तियाज अलींनी सांगितलाय.
असं रेकॉर्ड झालं विदा करो गाणं..
'विदा करो' गाण्याच्या रेकॉर्डिंगबद्दल बोलताना इम्तियाज अली म्हणाले - "रात्रीचे 2:30 वाजले होते. सिनेमाची सगळी टीम स्टुडिओत बसून निघण्याच्या तयारीत होती. त्याचवेळी ए.आर. रहमान स्टूडिओत आले. त्यांनी स्टुडिओच्या लाईट्स बंद करून मेणबत्तीचे दिवे लावायला सांगितलं. गाणं आणि संगीताचा प्रभावी माहोल याने निर्माण होईल असं त्याचं म्हणणं होतं. मग आमच्यात गुरूदत्त आणि इतर चित्रपटांच्या संगीताची चर्चा सुरू झाली. या चर्चेअखेरीस असं ठरलं की, जुन्या बॉलीवूड गाण्यांप्रमाणे नवीन गाण्याच्या ट्यूनची थीम ठेवावी असं ठरलं"
The amount of peace that this song holds>>>🥹🤌🏻✨
— 𝙎𝙖𝙣𝙞𝙫𝙖𝙖𝙧𝙖𝙢𝙤𝙙𝙞 𝙁𝙖𝙣🪐ᴺ ᴬ ⱽ ᴱ ᴱ ᴺ (@Naveen_Tweetz_) May 4, 2024
Vida Karo by Arijit Singh from Amar Singh Chamkila❤️🔥 pic.twitter.com/iwV8wpgTcT
इम्तियाज अली पुढे म्हणाला, "यावेळी मी प्रेक्षकांप्रमाणे बसून गाण्याची सर्व तयारी पाहत होतो. दरम्यान गीतकार इर्शाद कामिलने 45 मिनिटांत गाण्याचे बोल लिहून गाणं तयार केलं. गाणं समोर आल्यावर यावेळीच हे गाणे रेकॉर्ड होईल असं रहमान यांनी ठरवलं. स्टुडिओचे वातावरण बदलून गेलेलं. काही लोकांचे डोळे भरून आले होते. अशा स्थितीत रहमानने इर्शादला सांगितलं की.. इर्शाद, तुम्ही खूप सुंदर लिहिलं आहे.. हे गाणं ऐकून लोकं रडतील."