'चंदू चॅम्पियन'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; लवकरच गाठणार १०० कोटींचा आकडा?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 01:31 PM2024-06-25T13:31:23+5:302024-06-25T13:31:48+5:30

Chandu Champion: 'चंदू चॅम्पियन'ने ११ दिवसात तगडी कमाई केली आहे. त्यामुळे जाणून घ्या या सिनेमाच्या कमाईचा आकडा

chandu-champion-box-office-collection-day-11-kartik-aaryan-film-eleventh-day-second-monday-collection-net-in-india | 'चंदू चॅम्पियन'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; लवकरच गाठणार १०० कोटींचा आकडा?

'चंदू चॅम्पियन'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; लवकरच गाठणार १०० कोटींचा आकडा?

कार्तिक आर्यन याची मुख्य भूमिका असलेला चंदू चॅम्पियन (Chandu Champion)  या हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. रिलीजनंतर सुरुवातीचे काही दिवस या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर गती मंदावली होती. मात्र, आता या सिनेमाने कमाईच्या बाबतीत चांगलाच जोर धरला आहे. केवळ ११ दिवसात या सिनेमात जबरदस्ती कमाई केली आहे.

सध्या सोशल मीडियावर या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. इतकंच नाही तर कार्तिकच्या अभिनयाचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे. या सिनेमात कार्तिकने जर्मनी पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवूण देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली आहे.

11 दिवसात किती झाली चंदू चॅम्पियनची कमाई?

चंदू चॅम्पियन या सिनेमाने पहिल्या दिवशी ५.४० कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर खात उघडलं. त्यानंतर शनिवारी या सिनेमाने ७.७० कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने ११.०१ कोटींची कमाई केली. त्यानंतर अनुक्रमे ६.०१ कोटी, ३.०६ कोटी, ३.४० कोटी, ३.०१ कोटी, ३.३२ कोटी अशी कमाई केली. या सिनेमाने नवव्या आणि दहाव्या दिवशी ६.३०, ८.०१ कोटींची कमाई केली. यामध्येच आता या सिनेमाने ११ व्या दिवशी तब्बल २.१० कोटींची कमाई केली आहे.

दरम्यान, या सिनेमाने आतापर्यंत एकूण ५९.८६ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा लवकरच १०० कोटींचा गल्ला जमवणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमात कार्तिक व्यतिरिक्त भुवन अरोरा, यशपाल शर्मा, राजपाल यादव, अनिरुद्ध दवे आणि विजय राज ही कलाकार मंडळी झळकली आहेत.

Web Title: chandu-champion-box-office-collection-day-11-kartik-aaryan-film-eleventh-day-second-monday-collection-net-in-india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.