चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 12:17 PM2024-05-15T12:17:13+5:302024-05-15T12:19:20+5:30

कार्तिक आर्यन या पोस्टरमध्ये एका रेसलरच्या लूकमध्ये दिसतोय.

Chandu Champion Kartik Aryan s film first poster release fans excited | चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aryan) आगामी 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) सिनेमा चर्चेत आहे. नुकताच सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. कार्तिकच्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमाचं पहिलं पोस्टर पाहून तर ही आतुरता आणखी वाढली आहे. याआधी कार्तिकला कधीही न पाहिलेल्या अवतारात तो यामध्ये दिसून येतोय. अभिनेत्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते त्याच्यावर फिदा झालेत.

कार्तिक आर्यन या पोस्टरमध्ये एका रेसलरच्या लूकमध्ये दिसतोय. लाल रंगाच्या लंगोटमध्ये तो धावतोय. त्याची शरीरयष्टी एखाद्या कसलेल्या खेळाडूची असते अगदी तशीच दिसून येतेय. यामध्ये कार्तिक अतिशय कॉन्फिडंट दिसतोय. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो याआधी व्हायरल झाले होते. त्यात कार्तिक आर्मी युनिफॉर्ममध्ये दिसत होता. तर आता त्याला रेसलरच्या लूकमध्ये पाहून चाहतेही संभ्रमात पडलेत.नक्की सिनेमा काय असणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. 'चॅम्पियन येतोय... सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करताना मला खूप अभिमान आणि उत्सुकता वाटत आहे. हा माझ्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक सिनेमा आहे.' असं कॅप्शन कार्तिकने दिलं आहे. 

14 जून 2024 रोजी 'चंदू चॅम्पियन' रिलीज होणार आहे. काहीच दिवसात सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होईल. साजिद नाडियादवालाने  सिनेमाची निर्मिती केली आहे. कार्तिकचा यामध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स पाहायला मिळेल असं मेकर्सने म्हटलं आहे. त्यामुळे कार्तिकला या सिनेमात पाहणं चाहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे.

याशिवाय कार्तिकची 'आशिकी 3' मध्येही वर्णी लागली आहे. यामध्ये कार्तिकची हिरोईन कोण असणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. पण आतापर्यंत तारा सुतारिया, तृप्ती डिमरी यांची नावं चर्चेत होती.

Web Title: Chandu Champion Kartik Aryan s film first poster release fans excited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.