चेक बाऊन्स : राम गोपाल वर्मा यांना तीन महिने कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 08:06 IST2025-01-24T08:04:35+5:302025-01-24T08:06:22+5:30

Ram Gopal Varma News: अंधेरीच्या दंडाधिकारी न्यायालयाने चित्रपट निर्माते-दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिन्यांचा तुरुंगवास सुनावला.  वर्मा न्यायालयात हजर नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार  त्यांच्या अटकेसाठी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहेत.

Cheque bounce: Ram Gopal Varma sentenced to three months in prison | चेक बाऊन्स : राम गोपाल वर्मा यांना तीन महिने कारावासाची शिक्षा

चेक बाऊन्स : राम गोपाल वर्मा यांना तीन महिने कारावासाची शिक्षा

मुंबई - अंधेरीच्या दंडाधिकारी न्यायालयाने चित्रपट निर्माते-दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना चेक बाऊन्सप्रकरणी तीन महिन्यांचा तुरुंगवास सुनावला.  वर्मा न्यायालयात हजर नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार  त्यांच्या अटकेसाठी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहेत.

तक्रारदाराला ३.७२ कोटींची भरपाई
सन २०१८ मध्ये एका कंपनीने वर्मा यांच्या फर्मविरुद्ध चेक बाऊन्सची तक्रार नोंदवली होती. न्यायालयाने वर्मा यांना एप्रिल २०२२ मध्ये पाच हजार रुपयांच्या रोख रकमेचा जामीन मंजूर केला होता.

न्यायदंडाधिकारी वाय. पी. पुजारी यांनी मंगळवारी वर्मा यांना निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या तरतुदींतर्गत दोषी ठरवले. आदेशाच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत तक्रारदाराला ३ कोटी ७२ लाख २१९ रुपये भरपाई देण्याचे निर्देशही न्यायालयाने वर्मा यांना दिले.

Web Title: Cheque bounce: Ram Gopal Varma sentenced to three months in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.