"महाराष्ट्राचं मीठ खाल्लंय..." 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणारा अभिनेता म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:52 IST2025-02-20T13:52:07+5:302025-02-20T13:52:34+5:30
विनीत गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत.

"महाराष्ट्राचं मीठ खाल्लंय..." 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणारा अभिनेता म्हणाला...
Vineet Kumar Singh: 'छावा' (Chhaava) या चित्रपटाच्या माध्यमातून जगभरात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा पुन्हा एकदा पोहोचवली जात आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सिनेमात शंभू राजेंच्या भुमिकेत विकी कौशल आणि औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाचा अभिनय तर जबरदस्त आहेच, पण या दोघांसोबतच आणखी एका भुमिकेच कौतुक होत आहे. ती म्हणजे 'कवी कलश'. हे पात्र अभिनेता विनीत कुमार सिंहने साकारलं आहे. विनीतच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक चाहते करत आहेत. विनीत गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. पण, मुंबईत हक्काच घर खरेदी करू शकलेला नाही. पण, आता 'छावा' ला मिळालेल्या यशानंतर त्याला स्वत:चं घर विकत घेईल, अशी इच्छा एका नेटकऱ्यानं बोलून दाखवली. नेटकऱ्याच्या कमेंटवर विनीतनेही मनाला स्पर्श करणारं उत्तर दिलं आहे.
नुकतंच विनीतने शिवजंयतीच्या दिवशी तुळापूर भेटीचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहलं, "भावा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने तुझं मुंबईत लवकरच हक्काचं घर होईल. पुढच्या शिवजयंतीला तुझ्या मुंबईतील स्वत:च्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असेल". यावर विनीतने उत्तर देत म्हटलं, "महाराष्ट्राचं मी खूप मीठ खाल्लंय. महादेव, आई भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने जे होईल ते मला स्वीकार असेल. तुम्हा सर्वांच्या प्रेमळ संदेशासाठी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. हर हर महादेव!".
'छावा' गाजवणारा विनीत कुमार सिंग एक डॉक्टर असून त्याने अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. तो गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. अनेक सिनेमांमध्ये काम केलं, पण, त्याला प्रसिद्धी मिळाली. आता 'छावा' या सिनेमामुळे हा अभिनेता प्रसिद्धी झोतात आला आहे. 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'गँग्ज ऑफ वासेपूर २', 'मुक्काबाज' अशा सिनेमांमधून विनीत कुमार झळकला. विनीत कुमार सिंगबद्दल सांगायचं तर तो 'छावा'नंतर तो 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव' या सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे. बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेता म्हणून विनीतची ओळख आहे.