विकी कौशलच्या 'छावा'नं आतापर्यंत किती केली कमाई? दक्षिणही काबीज करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:11 IST2025-02-27T18:10:50+5:302025-02-27T18:11:01+5:30
विकी कौशलचा 'छावा' बॉक्स ऑफिसवर बुलेट ट्रेनपेक्षाही वेगाने कमाई करतोय.

विकी कौशलच्या 'छावा'नं आतापर्यंत किती केली कमाई? दक्षिणही काबीज करणार
Chhaava Box Office Collection: दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Director Laxman Utekar) यांचा 'छावा' (Chhaava Movie) हा चित्रपट यशाची शिखरं सर करत आहे. विकी कौशलच्या (Vicky Kaushal) या ड्रामा पीरियड चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कमाईच्या बाबतीत 'छावा'नं जबरदस्त कामगिरी दाखवली आहे. हा सिनेमा नफा तर कमावत आहेच, पण बिग बजेट सिनेमांचे रेकॉर्ड मोडत आहे.
विकी कौशलचा 'छावा' बॉक्स ऑफिसवर बुलेट ट्रेनपेक्षाही वेगाने कमाई करतोय. आतापर्यंत या चित्रपटाने ३९७.८६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांच्या अंदाजानुसार तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करण्यापूर्वी म्हणजेच दुसऱ्या आठवड्यातील गुरुवारी रात्रीपर्यंत 'छावा'ने ४०० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल. दिनेश विजन यांची निर्मिती असलेला ४०० कोटी रुपये कमवणारा 'छावा' दुसरा चित्रपट ठरणार आहे. याआधी 'स्त्री २'ने ६०० कोटींची कमाई केली आहे.
विशेष म्हणजे छावा हा सर्वाधिक कमाई करणारा ऐतिहासिक चित्रपट ठरला आहे. या सिनेमानं संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावत'लाही मागे टाकले आहे. तसेच आता छावा दाक्षिणात्य राज्यातही प्रदर्शित होणार आहे. एकीकडे दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत डब करून कोट्यवधी रुपयांची कमाई करत असताना 'छावा' दाक्षिणात्य भाषांमध्ये का प्रदर्शित केला नाही? असा प्रश्न अनेकांना सतावत होता. या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची वीर गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाचा तेलुगू भाषेतील प्रीमियर पुढल्या शुक्रवारी आंध्र प्रदेशमध्ये होणार आहे. चौथ्या आठवड्यात 'छावा' दक्षिण काबीज करण्यासाठी सज्ज झाला असून, तिथे धडाकेबाज बिझनेस करणार आहे. आता येत्या काळात 'छावा' मोठे मोठे रेकॉर्ड मोडताना पाहायला मिळणार आहे.