Chhaava Movie: 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ३ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 09:49 IST2025-02-17T09:47:06+5:302025-02-17T09:49:24+5:30
'छावा' सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे.

Chhaava Movie: 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ३ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी
Chhaava Box Office Collection Day 3: 'छावा' सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळतो आहे. 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची बॉक्स ऑफिवर यशस्वी घौडदौड सुरुच आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. 'छावा' पाहून विकी कौशल (vicky kaushal),रश्मिका मंदाना यांच्याबरोबरच प्रेक्षक चित्रपटातील कलाकारांचे कौतुक करताना थकत नाहीत. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. प्रदर्शनानंतर तिसऱ्या दिवशीही सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर जलवा आहे.
सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, तर या चित्रपटाने फक्त तीन दिवसांत बजेट वसूल केले. 'छावा' १३० कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेला होता. अवघ्या तीन दिवसांत संपूर्ण जगभरात या चित्रपटाने ११६.५ कोटींची कमाई केली. यासोबतच सिनेमाने पहिल्या दिवशीच तब्बल ३१ कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा विकी कौशलचा 'छावा' हा पहिलाच सिनेमा आहे. तर छावाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी तब्बल ३९.३० कोटींची कमाई केली असून दोन दिवसांत ७२.४० कोटींचा गल्ला जमावला.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ४८.५ कोटींची कमाई केली असून चित्रपटाचे तीन दिवसांचं देशभरातील एकूण कलेक्शन ११६.५ कोटी रुपये झालं आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवसाची आकडेवारी ही प्रारंभिक आहे, त्यामुळे यात बदल होण्याची शक्यता आहे.
सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्येच ५ लाख तिकीट विकले गेले होते. यातूनच १३.७० कोटी कमाई झाली होती. सिनेमाचं बजेट १३० कोटी आहे. २०२५ वर्षाची 'छावा'ने बॉलिवूडला दमदार सुरुवात करुन दिली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चं दिग्दर्शन केलं असून सिनेमात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, डायना पेंटी यांचीही भूमिका आहे. मॅडॉक फिल्म्स बॅनरअंतर्गत दिनेश विजान यांनी निर्मिती केली आहे.