Chhaava Movie : 'छावा'ची ५०व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर डरकाळी! निशाण्यावर आहेत या ४ सिनेमांचे रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:54 IST2025-04-04T17:51:23+5:302025-04-04T17:54:22+5:30

Chhaava Movie : अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)चा सिनेमा 'छावा'चा अखेर आज त्या सिनेमाच्या यादीत समावेश झाला आहे, ज्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर ५० दिवस पूर्ण केले आहेत.

'Chhaava' continues to do well at the box office even on its 50th day! The records of these 4 films are on the line | Chhaava Movie : 'छावा'ची ५०व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर डरकाळी! निशाण्यावर आहेत या ४ सिनेमांचे रेकॉर्ड

Chhaava Movie : 'छावा'ची ५०व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर डरकाळी! निशाण्यावर आहेत या ४ सिनेमांचे रेकॉर्ड

अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)चा सिनेमा 'छावा'(Chhaava Movie)चा अखेर आज त्या सिनेमाच्या यादीत समावेश झाला आहे, ज्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर ५० दिवस पूर्ण केले आहेत. मागील २-३ वर्षांतील सिनेमांवर नजर मारल्यावर या यादीत रणबीर कपूरचा अ‍ॅनिमल, शाहरुख खानचा जवान-पठाण, श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' आणि अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' यासारख्या सिनेमांचा समावेश आहे. बॉक्स ऑफिसवर ५० दिवस पूर्ण केल्यानंतरही चित्रपट कमाईच्या बाबतीत मागे पडण्याची चिन्हे दिसत नाहीत. सलमान खानचा सिकंदर आणि मोहनलालचा 'एल २ एम्पुरान' रिलीज झाला असतानाही हा चित्रपट उत्कृष्ट कामगिरी करत आहे. चित्रपटाच्या आजच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन संबंधित प्रारंभिक आकडे समोर आले आहेत, तर चला जाणून घेऊया चित्रपटाची आजची कमाई आणि आतापर्यंतची एकूण कमाई.

चित्रपटाच्या कमाईशी संबंधित अधिकृत आकडे बघितले तर, ७ आठवड्यांत म्हणजेच कालपर्यंत चित्रपटाने केवळ हिंदीतून ५९४ कोटी रुपये कमावले आहेत. तर, सॅकनिल्कच्या मते, चित्रपटाची तेलगूमधून ३ आठवड्यांत कमाई १५.८७ कोटी रुपये झाली आहे. म्हणजेच ७ आठवड्यांत चित्रपटाने दोन्ही भाषांमध्ये मिळून ६०९.८७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत चित्रपटाने ८ लाखांची कमाई केली आहे आणि त्यामुळे चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई ६०९.९५ कोटींवर पोहोचली आहे. हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.

आज 'छावा' मोडणार हे रेकॉर्ड
गेल्या २-३ वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपटांवर नजर टाकली तर, ५०व्या दिवशी ॲनिमलने ७ लाख रुपये कमावले होते. जवानने १५ लाख तर पठाणने २५ लाखांची कमाई केली. ५०व्या दिवशी स्त्री २ ची कमाई ५० लाख रुपये होती आणि त्याच दिवशी पुष्पाच्या हिंदी व्हर्जनची कमाई ३८ लाख रुपये झाली होती. छावा सिनेमाने अ‍ॅनिमलचा मोडला आहे. आता छावा सिनेमा उरलेल्या चित्रपटांपैकी कोणाचा विक्रम मोडतो आणि कोणाचा नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

'छावा'बद्दल
'छावा' या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्याशिवाय अक्षय खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याशिवाय संतोष जुवेकर, डायना पेंटी, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंग हे देखील सहाय्यक भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. १३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे.

Web Title: 'Chhaava' continues to do well at the box office even on its 50th day! The records of these 4 films are on the line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.