Chaava Vs Sikandar :'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी कायम! 'सिकंदर'वर ठरला वरचढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:37 IST2025-03-31T12:36:22+5:302025-03-31T12:37:04+5:30

Chaava Vs Sikandar : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'सिकंदर' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'छावा'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईपुढे हा चित्रपट फारसा कमाल दाखवू शकलेला नाही.

'Chhaava' continues to dominate at the box office! It has emerged as the winner over 'Sikander' | Chaava Vs Sikandar :'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी कायम! 'सिकंदर'वर ठरला वरचढ

Chaava Vs Sikandar :'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी कायम! 'सिकंदर'वर ठरला वरचढ

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान(Salman Khan)चा 'सिकंदर' सिनेमा (Sikandar Movie) बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. खरेतर रिलीज होण्यापूर्वी आलेला ॲडव्हान्स बुकिंग डेटा पाहता हा सिनेमा सलमानच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनिंग करणारा सिनेमा ठरेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र सॅकनिल्कवर आत्तापर्यंत अपडेट करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार तसे दिसत नाही. सिकंदर त्याच्या आधीच्या टायगर ३ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या ४३ कोटी रुपयांच्या कलेक्शनला मागे टाकू शकला नाही. एवढंच नाही तर या वर्षी रिलीज झालेल्या विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'छावा'(Chhaava Movie)च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनलाही तो स्पर्श करू शकला नाही.

अधिकृत आकडेवारीनुसार, छावाने पहिल्याच दिवशी ३३.५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यानंतर हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा ओपनिंग असलेला बॉलिवूड चित्रपट आणि गेम चेंजर (५४ कोटी) नंतर दुसरा सर्वात मोठा ओपनिंग असलेला भारतीय चित्रपट बनला आहे. सिकंदरने काल सकाळी १०. ३० पर्यंत  २६ कोटींचा गल्ला जमविला होता. म्हणजेच छावाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा हा चित्रपट खूपच मागे पडला आहे.

'सिकंदर' बनणार का 'छावा'सारखा ब्लॉकबस्टर?
१३० कोटींमध्ये बनलेल्या छावाने ४५ दिवसांत जवळपास ६०० कोटींची कमाई करून ब्लॉकबस्टर चित्रपट बनण्याचा विक्रम केला आहे. हा चित्रपट देशातील सर्वाधिक कमाई करणारा ७वा चित्रपट ठरला आहे. सिकंदरकडून अपेक्षा होत्या की हा चित्रपट छावाच्या लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड मोडेल. मात्र सलमानचा चित्रपट हे करू शकणार नाही हे सांगणे खूप घाईचे ठरेल. कारण १० एप्रिल रोजी सनी देओलच्या जाट प्रदर्शित होण्याआधी चित्रपटाला अजून १० दिवस बाकी आहेत. त्यामुळे सिकंदर चित्रपट काही इतिहास घडवण्याची शक्यता आहे.

'सिकंदर'ची स्टारकास्ट 
सिकंदर या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगदास यांनी केले आहे. चित्रपटात सलमानसोबत सत्यराज, रश्मिका मंदाना, प्रतीक बब्बर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

Web Title: 'Chhaava' continues to dominate at the box office! It has emerged as the winner over 'Sikander'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.