पटनाच्या ठेल्यावर 'छावा' फेम विकी कौशलने लिट्टी चोखावर मारला ताव, कतरिनासाठीही घेतलं पार्सल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 10:29 IST2025-02-10T10:28:21+5:302025-02-10T10:29:02+5:30
'Chhaava' fame Vicky Kaushal : अभिनेता विकी कौशल गेल्या काही दिवसापासून छावा सिनेमामुळे चर्चेत आहे. अलिकडेच तो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पाटणा येथे पोहोचला होता. यादरम्यान त्याने तिथल्या प्रसिद्ध स्ट्रीट फूड लिट्टी चोखाचा देखील आस्वाद घेतला.

पटनाच्या ठेल्यावर 'छावा' फेम विकी कौशलने लिट्टी चोखावर मारला ताव, कतरिनासाठीही घेतलं पार्सल
अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) गेल्या काही दिवसापासून 'छावा' (Chhaava Movie) सिनेमामुळे चर्चेत आहे. अलिकडेच तो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पाटणा येथे पोहोचला होता. अनेक कार्यक्रमात त्याचा सहभाग होता. यादरम्यान त्याने पाटण्यातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड लिट्टी चोखाचा देखील आस्वाद घेतला. त्याने त्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
विक्की कौशल पाटणा येथील तारांगणजवळील फूड कोर्टमध्ये पोहोचला आणि 'आरके लिट्टी'मधून लिट्टी चोखा ऑर्डर केला. तो अचानक तिथे दिसल्यामुळे उपस्थित लोकांना आश्चर्य वाटले. विकीने लिट्टीची चव चाखताच त्याचे कौतुक केले आणि म्हणाला, ''खूप छान आहे.'' नंतर त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करताना त्याने लिहिले, ''पाटनाला आल्यावर लिट्टी चोखा कसा मिस करू शकतो, गर्दा उड़ा दिया।''
जेव्हा तिथल्या न्यूज १८ च्या टीमने या दुकानाला भेट दिली आणि विकी कौशलच्या आवडीनिवडी विचारल्या तेव्हा दुकानदाराने सांगितले, ''त्याने लिट्टीचे दोन तुकडे खाल्ले आणि ते खूप आवडले. निघताना त्याने पत्नी कतरिना कैफ आणि टीमसाठी ४० लिट्टी पॅक केल्या आणि मुंबईला नेल्या.''
विकी लिट्टी खायला आला तेव्हा काय झालं?
पटनातील तारांगणाच्या जवळ असलेल्या व्हेंडर झोनमध्ये 'आरके लिट्टी' नावाचा एक स्टॉल आहे, जो २० वर्षांहून अधिक जुना आहे. विकी कौशलला लिट्टीची प्लेट देणारे धीरज कुमार म्हणाले, ''शनिवारी विकी कौशल त्याच्या टीमसोबत माझ्या दुकानात लिट्टी खायला आले होते. त्यांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लिट्टीची चव चाखली. खाल्ल्यानंतर विकी म्हणाला, ''चविष्ट आहे! पंजाबमध्ये हे मिळत नाही. पंजाबमध्येही दुकान सुरू करा.'' धीरज पुढे म्हणाले, "आम्हीच त्यांच्यासाठी प्लेट्स लावत होतो, त्यामुळेच आम्ही सर्व व्हिडिओंमध्ये दिसत होतो. त्याचा फोटोही आमच्यासोबत काढला. विकी सरांना भेटून खूप छान वाटले.''
कतरिनासाठी मुंबईला नेले लिट्टी
दुकानात लिट्टी बनवणारा दुसरा कर्मचारी म्हणाला, ''विकी सर आमच्या दुकानात आले तेव्हा म्हणाले, आम्ही लांबून आलो आहे, तुमच्या लिट्टीची मुंबईतही चर्चा आहे. यानंतर, त्यांना दोन लिट्टी, चटणी, चोखा, कोशिंबीर आणि मिरची दिली गेली, ज्याचा त्यांनी खूप आनंद घेतला. त्याचा फोटोही त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दुकानदार पुढे म्हणाला, ''विकी सरांनी लिट्टीचे दोन तुकडे खाल्ले आणि ४० तुकडे पॅक करून मुंबईला घेऊन गेले. निघताना ते म्हणाले, 'मी कतरिनालाही खायला देईन.' त्याचवेळी उपस्थित कर्मचारी आणि ग्राहकांनीही विक्कीसोबत त्यांचे फोटो क्लिक केले. दुकानदार म्हणाला, ''आम्ही पैसे घेत नव्हतो, पण त्यांनी आम्हाला जबरदस्तीने दिले. एकूण बिल २३३० रुपये होते, पण त्यांनी २५०० रुपये दिले.''