रेकॉर्ड मोडणार! 'छावा'च्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात; तिकिटाचे दर किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 10:09 IST2025-02-09T10:08:58+5:302025-02-09T10:09:32+5:30

'छावा' सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात झाली आहे. सकाळच्या पहिल्या शोची तिकीट विकलं जातंय इतक्या रुपयांना (chhaava)

chhaava movie advance booking open ticket price details vicky kaushal rashmika mandanna | रेकॉर्ड मोडणार! 'छावा'च्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात; तिकिटाचे दर किती?

रेकॉर्ड मोडणार! 'छावा'च्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात; तिकिटाचे दर किती?

 'छावा' (chhaava movie) सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. केवळ पाच दिवसांमध्ये हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.  'छावा' सिनेमा पाहण्यासाठी जगभरातील तमाम सिनेप्रेमी उत्सुक आहेत. 'छावा' सिनेमात विकी कौशलने (vicky kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना (rashmika mandanna) महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकतेय. औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना (akshaye khanna) पाहायला मिळतोय.  'छावा'च्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात झाली आहे. तिकिटाची रक्कम वाचून व्हाल थक्क.

छावाचं तिकिट किती रुपयांना मिळतंय

मॅडॉक फिल्मसची निर्मिती असलेला 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होतोय. या सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात झाली आहे. बूक माय शो या तिकिट बुकींग साइटवर गेल्यास तुम्हाला कळेल की, अनेक ठिकाणी पहिल्या मॉर्निंग शोचं तिकिट ३०० ते ३५० च्या घरात विकलं जातंय. मॉर्निंग शोचं तिकिट अनेकदा स्वस्त असतं. परंतु 'छावा'च्या पहिल्या शोचं तिकिट २०० ते ४०० च्या रेंजमध्ये आहे. इतकंच नव्हे तर PVR, INOX सारख्या थिएटर्समध्ये काही ठिकाणी हेच तिकीट ४५०-५०० रुपयांपर्यंत बघायला मिळतंय. 


छावा Imax मध्येही बघू शकता

'छावा'च्या मेकर्सने नुकतीच एक खास घोषणा केली त्यामुळे सर्वांना आनंद झाला. तो म्हणजे 'छावा' आता Imax मध्येही बघता येणार आहे. रुपेरी पडद्यावर 'छावा' Imax मध्ये बघता येणार असल्याने दर्दी प्रेक्षकांना सुखद धक्का मिळालाय. परंतु यासाठी प्रेक्षकांना मोठी रक्कम मोजावी लागेल. कारण  'छावा' सिनेमा Imax मध्ये बघण्यासाठी ५०० ते ८०० च्या घरात तिकिट उपलब्ध आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा अनुभवायला मिळणार आहे.

 

Web Title: chhaava movie advance booking open ticket price details vicky kaushal rashmika mandanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.