रक्ताने माखलेला चेहरा, शरीरावरच्या जखमा! 'छावा'च्या क्लायमॅक्सचे अंगावर काटा आणणारे पडद्यामागील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:10 IST2025-02-17T15:10:05+5:302025-02-17T15:10:40+5:30

'छावा'च्या मेकअप आर्टिस्टने विकी कौशलचे BTS फोटो. प्रत्येक सीनसाठी किती मेहनत घेतलीय हे यातून पाहायला मिळतंय (chhaava, vicky kaushal)

chhaava movie climax bts scene vicky kaushal rashmika manddanna akshaye khanna | रक्ताने माखलेला चेहरा, शरीरावरच्या जखमा! 'छावा'च्या क्लायमॅक्सचे अंगावर काटा आणणारे पडद्यामागील फोटो

रक्ताने माखलेला चेहरा, शरीरावरच्या जखमा! 'छावा'च्या क्लायमॅक्सचे अंगावर काटा आणणारे पडद्यामागील फोटो

'छावा' सिनेमाची (chhaava movie) सध्या चांगलीच उत्सुकता आहे. सिनेमातील प्रत्येक सीनला प्रेक्षकांच्या टाळ्या अन् शिट्ट्या पडत आहेत. मध्यंतरापूर्वी थिएटरमध्ये जोशपूर्ण असलेलं वातावरण मध्यंतरानंतर मात्र एकदम शांत होतं. शेवटच्या ४० मिनिटांमध्ये औरंगजेब संभाजी महाराजांचे जे हाल करतो ते पाहणं हा खूप वेदनादायी अनुभव आहे. या सीनच्या शूटिंगचे पडद्यामागील BTS फोटो 'छावा'चे मेकअप आर्टिस्ट प्रीतिशील सिंग यांनी शेअर केले आहेत. सिनेमाच्या क्लायमॅक्सचे पडद्यामागील क्षण प्रीतिशील यांनी दाखवले आहेत.

'छावा'चे पडद्यामागील अंगावर काटा आणणारे सीन्स

'छावा' सिनेमाचे मेकअप आर्टिस्ट प्रीतिशील सिंग यांनी 'छावा' सिनेमाचे BTS फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये विकी कौशलला क्लायमॅक्स सीनसाठी मेकअपमन तयार करताना दिसत आहेत. रक्ताने माखलेला चेहरा अन् जीभेतून पडणारे रक्ताचे थेंब, संपूर्ण शरीरावर झालेल्या जखमा या अवतारात विकी पाहायला मिळतोय. एका फोटोत विकीचे हात बांधलेले दिसत आहेत. विकीने 'छावा'मधील क्लायमॅक्स सीनसाठी अहोरात्र मेहनत करताना दिसली आहे. हे फोटो पाहून सर्वचजण थक्क झाले आहेत. यासाठी मेकअप आर्टिस्ट प्रीतिशील सिंगचं सर्व अभिनंदन करत आहेत.






'छावा'ची कमाई १०० कोटी पार

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'छावा' चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ४८.५ कोटींची कमाई केली असून चित्रपटाचे तीन दिवसांचं देशभरातील एकूण कलेक्शन ११६.५ कोटी रुपये झालं आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवसाची आकडेवारी ही प्रारंभिक आहे, त्यामुळे यात बदल होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 'छावा' हाउसफुल्ल गर्दीत सुरु आहे. लक्ष्मण उतेकरांनी 'छावा'चं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

Web Title: chhaava movie climax bts scene vicky kaushal rashmika manddanna akshaye khanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.