'छावा' सिनेमा 'या' तारखेला पाहा फक्त ९९ रुपयांमध्ये; मेकर्सची खास ऑफर, आताच जाणून घ्या

By देवेंद्र जाधव | Updated: March 20, 2025 11:40 IST2025-03-20T11:39:10+5:302025-03-20T11:40:20+5:30

'छावा' सिनेमा या तारखेला तुम्हाला फक्त ९९ रुपयांमध्ये बघायला मिळणार आहे. निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी खास ऑफर ठेवली आहे

Chhaava movie for just Rs 99 Special offer from the maddock films vicky kaushal rashmika mandanna | 'छावा' सिनेमा 'या' तारखेला पाहा फक्त ९९ रुपयांमध्ये; मेकर्सची खास ऑफर, आताच जाणून घ्या

'छावा' सिनेमा 'या' तारखेला पाहा फक्त ९९ रुपयांमध्ये; मेकर्सची खास ऑफर, आताच जाणून घ्या

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमाची (chhaava movie) चांगलीच चर्चा आहे. विकी कौशलने (vicky kaushal) सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. विकीने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. या सिनेमाने जगभरात ६०० कोटींहून अधिकची कमाई केली.  'छावा' पाहण्यासाठी आजही थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी होताना दिसतेय. अशातच मेकर्सने  'छावा' सिनेमाचं तिकीट स्वस्त केलंय.  'छावा' सिनेमा फक्त ९९ रुपयांमध्ये आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. जाणून घ्या सविस्तर

'छावा' सिनेमा फक्त ९९ रुपयांमध्ये

नुकतंच  'छावा' सिनेमाचे निर्माते मॅडॉक फिल्मस यांनी सोशल मीडियावर  'छावा' सिनेमाच्या खास ऑफरचा खुलासा केलाय.  'छावा' सिनेमा या शुक्रवारी म्हणजेच २१ मार्चला फक्त ९९ रुपयांमध्ये बघायला मिळणार आहे. ही ऑफर फक्त शुक्रवारपर्यंतच लागू आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नजीकच्या थिएटरमध्ये  'छावा' उद्या २१ मार्चला फक्त ९९ रुपयांमध्ये बघता येईल. यामुळे  'छावा'च्या कमाईत आणखी वाढ होईल यात शंका नाही.




'छावा'ला मिळाला रिपिट ऑडियन्स

विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या  'छावा' सिनेमाला रिपीट ऑडियन्स मिळाला आहे. म्हणजेच  'छावा' सिनेमा थिएटरमध्ये बघायला लोक पुन्हा पुन्हा जात आहेत. महाराष्ट्रातील गावांमध्ये  'छावा'चे शो होत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना  'छावा' बघून छत्रपती संभाजी महाराजांची गाथा अनुभवायला मिळतेय.  'छावा' सिनेमात अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली असून रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे.

Web Title: Chhaava movie for just Rs 99 Special offer from the maddock films vicky kaushal rashmika mandanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.