'छावा'मध्ये लोकप्रिय कलाकारांची फौज! सिनेमात ऐतिहासिक भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:20 IST2025-01-23T18:19:47+5:302025-01-23T18:20:17+5:30
'छावा' सिनेमात लोकप्रिय कलाकार कोणत्या भूमिकेत दिसणार आहेत? एका क्लिकवर जाणून घ्या (chhaava)

'छावा'मध्ये लोकप्रिय कलाकारांची फौज! सिनेमात ऐतिहासिक भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार? जाणून घ्या
विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या 'छावा' सिनेमाचा ट्रेलर काल रिलीज झाला. सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच सर्वांनी 'छावा' सिनेमाला पसंती दिली. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांची झलक बघायला मिळतेय. विकी कौशल सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची, रश्मिका महाराणी येसूबाईंची तर अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका करतोय हे एव्हाना सर्वांना कळालंय. या सिनेमात आणखी कोणते कलाकार, कोणत्या भूमिका साकारणार आहेत, जाणून घ्या
छावा सिनेमाची स्टारकास्ट पुढीलप्रमाणे:
- छत्रपती संभाजी महाराज-विकी कौशल
- औरंगजेब-अक्षय खन्ना
- महाराणी येसूबाई-रश्मिका मंदाना
- सरसेनापती हंबीरराव- आशुतोष राणा
- कवी कलश- विनित कुमार सिंग
- रायाजी- संतोष जुवेकर
- औरंगजेबाची मुलगी- डायना पेन्टी
- सोयराबाई- दिव्या दत्ता
- येसाजी कंक- प्रदीप सिंग रावत
- मुघलांचा राजा- नील भूपालम
अशाप्रकारे 'छावा' सिनेमात हे लोकप्रिय कलाकार दिसणार आहेत. याशिवाय या सिनेमात मराठी अभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेता शुभंकर एकबोटेही पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या भूमिकेचा अद्याप खुलासा झाला नाहीये. 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला संपूर्ण भारतात रिलीज होतोय. लक्ष्मण उतेकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. याशिवाय दिनेश विजन सिनेमाचे निर्माते आहेत. 'छावा'ची संपूर्ण देशाला उत्सुकता आहे.