तारीख नोट करुन ठेवा! थिएटर गाजवल्यानंतर 'छावा' आता ओटीटीवर होणार रिलीज; कुठे बघाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:50 IST2025-03-11T17:49:54+5:302025-03-11T17:50:33+5:30

'छावा' सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. कधी अन् कुठे बघाल याविषयी बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या (chhaava)

chhaava ott release date starring Vicky Kaushal rashmika mandanna akshaye khanna | तारीख नोट करुन ठेवा! थिएटर गाजवल्यानंतर 'छावा' आता ओटीटीवर होणार रिलीज; कुठे बघाल?

तारीख नोट करुन ठेवा! थिएटर गाजवल्यानंतर 'छावा' आता ओटीटीवर होणार रिलीज; कुठे बघाल?

विकी कौशलचा'छावा'  (chhaava) सिनेमा चांगलाच गाजतोय. 'छावा' रिलीज होऊन आता एक महिना पूर्ण होईल. अजूनही हा सिनेमा पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. विकी कौशलने (vicky kaushal) सिनेमात साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका चांगलीच गाजली.  'छावा' सिनेमा ज्यांना थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांना आता सिनेमा ओटीटीवर घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे. कारण  'छावा'च्या ओटीटी रिलीजबद्दल महत्वाची अपडेट समोर आलीय.

 'छावा' सिनेमा या तारखेला ओटीटीवर होणार रिलीज

विकी कौशलचा  'छावा' (chhaava) आता लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुढील महिन्यात अर्थात ११ एप्रिल २०२५ ला 'छावा' सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. याविषयी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा झाली नाहीये. 'छावा' थिएटरमध्ये अजूनही चांगली कमाई करतोय. त्यामुळे 'छावा' सिनेमाचं ओटीटी रिलीज पुढेही ढकलण्यात येऊ शकतं. प्राथमिक स्तरावर 'छावा' एप्रिलमध्ये (chhaava on ott) ओटीटीवर रिलीज होणार आहे.

'छावा' सिनेमाविषयी

'छावा' सिनेमा खूप गाजला. आधी हा सिनेमा डिसेंबर २०२४ मध्ये रिलीज होणार होता. परंतु निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेट बदलली. त्यानंतर 'छावा' हा सिनेमा  शिवजयंतीच्या निमित्ताने अर्थात १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज झाला. सिनेमा रिलीज होताच विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. याशिवाय अक्षय खन्नाने सिनेमात साकारलेली औरंगजेबाची भूमिकाही चांगलीच गाजली.

Web Title: chhaava ott release date starring Vicky Kaushal rashmika mandanna akshaye khanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.