'छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है और हम...'; विकी कौशलच्या 'छावा'चा जबरदस्त टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 11:33 AM2024-08-19T11:33:33+5:302024-08-19T11:36:07+5:30

विकी कौशलच्या बहुचर्चित 'छावा'चा जबरदस्त टीझर रिलीज झालाय. विकी कौशलला संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहणं एक पर्वणी असणार आहे

chhaava teaser starring vicky kaushal rashmika mandanna bassed on chatrapati sambhaji maharaj | 'छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है और हम...'; विकी कौशलच्या 'छावा'चा जबरदस्त टीझर रिलीज

'छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है और हम...'; विकी कौशलच्या 'छावा'चा जबरदस्त टीझर रिलीज

गेल्या अनेक दिवसांपासून विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाची उत्सुकता होती. काही महिन्यांपूर्वीच 'छावा' सिनेमाच्या सेटवरुन फोटो व्हायरल झाले होते. कपाळावर शिवगंध अन् वाढलेल्या केसांमध्ये विकीच्या लूकला चांगलीच पसंती मिळाली. आता बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'छावा' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. या टीझरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या आक्रमक अवतारात विकी पाहायला मिळतोय. 

'छावा'च्या टीझरमध्ये काय आहे?

साधारण १ मिनिटांचा असणारा 'छावा'चा टीझर अंगावर काटा आणणारा आहे यात शंका नाही. या टीझरमध्ये सुरुवातीला बघायला मिळतं की गनिमांचा किल्ल्याला वेढा पडलेला आहे. पुढे चिलखत परिधान करुन घोड्यावर स्वार होत संभाजी महाराज शत्रूंचा सामना करण्यासाठी सज्ज असतात. 'छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है और हम छावा', असा जबरदस्त डायलॉग सिनेमात दिसतो. संभाजी महाराज आक्रमकपणे गनिमांशी लढताना दिसतात. शेवटी छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणत सिंहासनावर विराजमान असलेले शंभूराजे बघायला मिळतात. 


विकीचा जबरदस्त अभिनय, कधी होणार छावा रिलीज

एक मिनिटांच्या 'छावा'च्या टीझरमध्ये प्रत्येक क्षणी विकीचा जबरदस्त अभिनय बघायला मिळतोय. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलला पाहणं ही एक पर्वणी असणार यात शंका नाही. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चं दिग्दर्शन केलंय. या सिनेमात रश्मिका मंदाना येसूबाईंची भूमिका साकारत आहे. ६ डिसेंबरला 'छावा' सिनेमा रिलीज होणार आहे. मॅडॉक फिल्मने या सिनेमाची निर्मिती केलीय. 

Web Title: chhaava teaser starring vicky kaushal rashmika mandanna bassed on chatrapati sambhaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.