प्रेक्षकांची घोर निराशा! ओटीटीवर 'छावा' पाहणाऱ्यांचा मोठा अपेक्षाभंग, कारण नेमकं काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:09 IST2025-04-11T16:06:57+5:302025-04-11T16:09:14+5:30
'छावा' सिनेमा ओटीटीवर आज रिलीज झाला. पण ज्यांनी सिनेमा ओटीटीवर पाहिला त्यांची निराशा झालीय. कारण आलं समोर (chhaava)

प्रेक्षकांची घोर निराशा! ओटीटीवर 'छावा' पाहणाऱ्यांचा मोठा अपेक्षाभंग, कारण नेमकं काय?
'छावा' सिनेमाची (chhaava movie) चांगलीच चर्चा झाली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. रिलीजच्या आधी 'छावा'मधील लेझीम दृश्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. परंतु नंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (laxman utekar) यांनी या सिनेमातून लेझीम दृश्य काढून टाकलं आणि सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. आता नुकतंच 'छावा' सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. परंतु ज्यांनी 'छावा' ओटीटीवर पाहिला त्यांची मात्र घोर निराशा झालीय. काय आहे यामागचं कारण?
'छावा' सिनेमा पाहण्याऱ्यांची निराशा कारण...
'छावा' सिनेमा ओटीटीवर आज रिलीज झाला. लोकांना कधी एकदा 'छावा' सिनेमा सहकुटुंब पाहतोय, असं झालं होतं. परंतु 'छावा' पाहणाऱ्या अनेकांची निराशा झाली. यामागचं कारण म्हणजे, सध्या नेटफ्लिक्सवर 'छावा' सिनेमाचं फक्त हिंदी वर्जन रिलीज करण्यात आलंय. परंतु 'छावा' सिनेमा हा तेलुगु भाषेतही रिलीज झाला होता. त्यामुळे हिंदीसोबत 'छावा' सिनेमाचं वर्जन इतर साऊथ भाषांमध्येही पाहायला मिळेल, अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु असं न झाल्याने 'छावा' सिनेमा पाहणाऱ्या बिगर हिंदी भाषिकांची मात्र निराशा झालीय. त्यामुळे 'छावा' सिनेमाचं तेलुगु वर्जन पाहण्याची अपेक्षा असणाऱ्या अनेकांचा अपेक्षाभंग झालाय. दरम्यान हिंदीनंतर लवकरच 'छावा'चं तेलुगु वर्जन पाहता येईल, अशी सर्वांना आशा आहे.
'छावा' सिनेमाची बॉक्स ऑफिस कमाई
'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारीला रिलीज झाला. या सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. अभिनेत्री रश्मिका मंदाना सिनेमा महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसली. याशिवाय औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना झळकला. २०२५ चा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून 'छावा' सिनेमाकडे पाहिलं जातंय. 'छावा' सिनेमाने जगभरात ८०० कोटींहून जास्त कमाई केलीय. 'छावा' ओटीटीवर रिलीज करण्यात आला असला तरीही अजूनही थिएटरमध्ये हा सिनेमा चांगल्या प्रतिसादात सुरु आहे.