Box Office Collection day 7:दीपिकाचा 'छपाक' थंड बस्त्यात, तर अजयचा 'तान्हाजी' सुसाट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 05:06 PM2020-01-17T17:06:10+5:302020-01-17T17:09:39+5:30
दीपिका पादुकोणचा छपाक सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे.
दीपिका पादुकोणचाछपाक सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. हा सिनेमा अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर बेतलेला आहे. मात्र दीपिका JNUमध्ये गेल्यापासून हा राजकीय मुद्दा बनला आणि त्यानंतर लोकांनी छपाक बॉयकॉट करण्याची मागणी केली आणि त्याचा असर सिनेमाच्या बिझनेसवर पडला आहे.
#Chhapaak disappoints... Lacklustre trending in Week 1... Partial holidays [Tue and Wed] helped marginally... Will find the going tough in Week 2... Fri 4.77 cr, Sat 6.90 cr, Sun 7.35 cr, Mon 2.35 cr, Tue 2.55 cr, Wed 2.61 cr, Thu 1.85 cr. Total: ₹ 28.38 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) 17 January 2020
सातव्या दिवशी हा सिनेमा आकडे पाहाता कमर्शियली फ्लॉप ठरला आहे. गुरुवारी या सिनेमाने अवघ्या 1.85 कोटींचा बिझनेस केला. जो खूपच कमी आहे.
एकूण सात दिवसांत छपाकने फक्त 28.38 कोटी इतकाच गल्ला जमावला आहे. तर छपाकसोबत रिलीज झालेल्या अजय देवगणच्या तान्हाजी सिनेमा सात दिवसात 118.91 कोटींचा बिझनेस केला.
मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारीत आहे.या चित्रपटाचं प्रमोशन व खर्च पकडून या चित्रपटाचं एकूण बजेट ४५ कोटी आहे. चित्रपट हिट होण्यासाठी ६० कोटींची कमाई करावी लागेल. छपाकला एकूण २,१६० स्क्रीन्स मिळाले आहेत. भारतात १७०० स्क्रीन्स व परदेशात ४६० स्क्रीन्सचा समावेश आहे.