"छत्रपती शिवाजी हे खरे सुपरहिरो असून...", विकी कौशलच्या एका वाक्याने सर्वांची मनं जिंकली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 05:21 PM2024-08-20T17:21:07+5:302024-08-20T17:21:55+5:30
विकी कौशलने 'छावा'च्या टीझर लॉंचवेळी केलेल्या छत्रपती शिवरायांबद्दल मोठं वक्तव्य केलं (vicky kaushal, chhaava)
'छावा' सिनेमाचा टीझर काल लॉंच झाला. विकी कौशल सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. केवळ एका मिनिटांच्या या टीझरने विकीने सर्वांची वाहवा मिळवली आहे. विकीचा संभाजी महाराजांच्या भूमिकेतील रुद्रावतार आणि त्याचा अभिनय अशा अनेक गोष्टींची चांगलीच चर्चा आहे. 'छावा'च्या टीझर लॉंचला विकी कौशलच्या एका वक्तव्याने त्याने पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकलंय.
विकी कौशल छत्रपती शिवरायांबद्दल काय म्हणाला?
विकी कौशल टीझर लॉंचच्या वेळी म्हणाला की, "परदेशात अव्हेंजर वगैरे सिनेमे बनवायची आवश्यकता असते. कारण त्यांच्याकडे तसे सुपरहिरो नाही आहेत. आपल्याकडे भारतात मात्र अव्हेंजर्स वगैरे बनवायची गरज नाही. भारताच्या इतिहासात डोकावलंत तर आपल्याकडे छत्रपती शिवाजी, संभाजी यांच्यासारखे सुपरहिरो आहेत. अशा महान व्यक्तिमत्वांसमोर इतर सुपरहिरो फेल आहेत. अशा प्रेरणादायी गोष्टींना आपण एकत्र सेलिब्रेट केलं पाहिजे."
विकी कौशलच्या 'छावा'ची उत्सुकता शिगेला
कालच विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या 'छावा' सिनेमाचा टीझर लॉंच झाला. हा टीझर अल्पावधीत प्रेक्षकांना आवडला. विकी कौशलने संभाजी महाराजांच्या भूमिकेत केलेल्या जबरदस्त अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधलं. 'छावा' सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलंय. या सिनेमात रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूमिकेत झळकत आहे. ६ डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सर्वांना सिनेमाची उत्सुकता आहे.