Chhichhore Box Office Collection Day 3: छिछोरे या चित्रपटाने तीनच दिवसांत केली बक्कळ कमाई, आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 06:30 AM2019-09-10T06:30:00+5:302019-09-10T06:30:02+5:30
Chhichhore Box Office Collection Day 3: छिछोरे या चित्रपटाला पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने केवळ तीनच दिवसांत खूपच चांगली कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे.
छिछोरे या चित्रपटात सुशांत सिंग रजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, ताहीर राज भसीन, नवीन पॉलिशेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने केवळ तीनच दिवसांत खूपच चांगली कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे.
छिछोरे या चित्रपटात आपल्याला आताचा आणि नव्वदीचा असे दोन काळ पाहायला मिळत आहेत. नव्वदीच्या काळात आपल्याला कॉलेज जीवन, हॉस्टेल लाईफ पाहायला मिळते तर आताच्या काळात आपल्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू न शकणाऱ्या एका मुलाची कथा पाहायला मिळते. छिछोरे या चित्रपटाची कथा जुनीच असली तरी ती चांगल्या पद्धतीने मांडण्यात आलेली आहे आणि त्याचमुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
छिछोरे या चित्रपटाने पहिल्या तीनच दिवसांत 35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. boxofficeindia.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी सात कोटींचा गल्ला जमवला होता. माऊथ पब्लिसिटीमुळे या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 70 टक्क्यांची वाढ झाली आणि या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 11.75 ते 12 कोटींच्या आसपास कमाई केली तर रविवारी या चित्रपटाने 16 लाख रुपये कमावले. या चित्रपटाला तरुण वर्गाचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. अपयशाने खचून जाऊ नका असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. तसेच आपल्या मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका हे देखील या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे.
छिछोरे या चित्रपटातील सुशांत सिंग रजपूत, सेक्साच्या भूमिकेतील वरुण शर्मा, डेरेकच्या भूमिकेतील ताहीर राज भसीन, ॲसिडच्या भूमिकेतील नवीन पॉलिशेट्टी आणि खलनायकाच्या भूमिकेतील प्रतीक बब्बर प्रेक्षकांना चांगलेच भावत आहेत. तसेच या चित्रपटातील संवाद प्रेक्षकांच्या आणि विशेषतः कॉलेजमधील मुलांच्या पसंतीस उतरत आहेत. छिछोरे या चित्रपटाची केवळ तीन दिवसांची ही कमाई पाहाता हा चित्रपट लवकरच 50 कोटींचा टप्पा पार करेल असे म्हटले जात आहे.