'मासूम'मधील हा 'छोटा बच्चा' आता झाला मोठा आणि हॅंडसम, बघा आता कसा दिसतो!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 06:08 PM2022-01-31T18:08:36+5:302022-01-31T18:11:32+5:30

फार कमी लोकांना माहीत असेल की, Hero No 1 या सिनेमात रिंकू बनलेला Omkar Kapoor आज बॉलिवूडचा अभिनेता बनला आहे. आता फार हॅंडसम आणि स्टायलिश झाला आहे.

Child actor Omkar Kapoor is a big and handsome man now see his latest photos | 'मासूम'मधील हा 'छोटा बच्चा' आता झाला मोठा आणि हॅंडसम, बघा आता कसा दिसतो!

'मासूम'मधील हा 'छोटा बच्चा' आता झाला मोठा आणि हॅंडसम, बघा आता कसा दिसतो!

googlenewsNext

डेविड धवन आणि गोविंदा या जोडीचा 'हिरो नंबर १' हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. १९९७ मध्ये आलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं होतं. यात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यासोबतच या सिनेमात परेश रावल, कादर खान, सतीश शाह, शक्ती कपूर, हिमानी शिवपुर यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या. तुम्हाला आठवत असेल तर या सिनेमात एका छोटा मुलगाही होता. जो फारच मस्तीखोर होता. त्याचं नाव आहे ओमकार कपूर. तो या सिनेमात रिंकू बनला होता. रिंकूची भूमिका करणारा Omkar Kapoor आता मोठा आणि हॅंडसम झाला आहे.

फार कमी लोकांना माहीत असेल की, या सिनेमात रिंकू बनलेला Omkar Kapoor आज बॉलिवूडचा अभिनेता बनला आहे. आता फार हॅंडसम आणि स्टायलिश झाला आहे. ओमकार कपूरचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. ज्यात तो गोल्डन कलरच्या शेरवानीमध्ये  कूल दिसत आहे. ओमकारचा हा फोटो अभिनेत्री मौनी रॉयच्या लग्नातील आहे. नुकतंच मौनीचं लग्न झालं, यात ओमकार कपूर पोहोचला होता.

ओमकार कपूरने Hero no 1. सोबतच बालकलाकार म्हणून बऱ्याच सिनेमात काम केलं. तो अनिल कपूर आणि श्रीदेवीच्या 'जुदाई' सिनेमातही दिसला होता. 'मासूम' सिनेमातून त्याला ओळख मिळाली होती. तसेच 'छोटा बच्चा' हे याच सिनेमातील गाणंही हिट झालं होत. आता तो हिरो म्हणून 'झूठा कहीं का', 'प्यार का पंचनामा 2', 'यू मी और घर और भूत' सिनेमात दिसला. येणाऱ्या काळातही त्याचे काही चांगले सिनेमे बघायला मिळणार आहेत.
 

Web Title: Child actor Omkar Kapoor is a big and handsome man now see his latest photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.