फिल्मी दुनियेपासून दूर आहे चाइल्ड आर्टिस्ट बेबी गुड्डू, वाचा आता कुठे राहते आणि काय करते?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 11:15 AM2020-12-22T11:15:31+5:302020-12-22T11:23:00+5:30
बेबी गुड्डूचं खरं नाव शाहिंदा बेग आहे. ती फिल्ममेकर एम.एम. बेग यांची मुलगी आहे. १९८४ मध्ये बेबी गुड्डूचा पहिला सिनेमा 'पाप और पुण्य' आला होता.
८०च्या दशकात फिल्मी दुनियेतील सर्वात पॉप्युलर चाइल्ड आर्टिस्ट बेबी गुड्डू आजही अनेकांना आठवते. अनेक जाहिराती आणि सिनेमातून तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. आता ही क्यूट वाटणारी गुड्डू बॉलिवूडपासून दूर आहे, पण फॅन्सना आजही तिची आठवण येते.
बेबी गुड्डूचं खरं नाव शाहिंदा बेग आहे. ती फिल्ममेकर एम.एम. बेग यांची मुलगी आहे. १९८४ मध्ये बेबी गुड्डूचा पहिला सिनेमा 'पाप और पुण्य' आला होता. त्यासोबतच तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं. बेबी गुड्डू तिच्या टूथपेस्टच्या जाहिरातीने घराघरात ओळखली जाऊ लागली होती.
बेबी गुड्डूने अनेक सिनेमात यादगार भूमिकाही साकारल्या आहेत. छोट्याशा वयातही तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. बेबी गुड्डूने 'औलाद', 'समंदर', 'परिवार', 'घर-घर की कहानी', 'मुल्जिम', 'नगीना' आणि 'गुरू समेत' सहीत अनेक हिंदी सिनेमात दिसली आहे.
बेबी गुड्डूने अमिताभ बच्चन, सनी देओल, श्रीदेवी, जया प्रदा, जितेंद्र आणि मिथुन यांच्यासारख्या मोठ्या स्टार्ससोबत काम केलं आहे. सध्या बेबी गुड्डू तिच्या संसारात आनंदी आहे. वैवाहिक जीवन एन्जॉय करते आहे. चाइल्ड आर्टिस्ट म्हणून बेबी गुड्डूचा शेवटचा सिनेमा १९९१ मध्ये आलेला 'घर परिवार' होता. असे सांगितले जाते की, ११ वर्षांची असताना तिने सिनेमात काम करणं सोडलं आणि शिक्षणाकडे लक्ष दिलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेबी गुड्डू दुबईमध्ये राहते आणि अमीरात एअरलाइन्समध्ये काम करते. पण जेव्हा कधी एखाद्या चाइल्ड आर्टिस्टचा विषय निघतो तेव्हा सर्वातआधी बेबी गुड्डूचा चेहरा नक्कीच आठवतो.