Gandhi Godse – Ek Yudh Trailer : “गोडसे एका दिवसात बनता येतं, पण गांधी…” ‘गांधी गोडसे’चा ट्रेलर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 03:14 PM2023-01-11T15:14:07+5:302023-01-11T15:17:05+5:30

Gandhi Godse – Ek Yudh Trailer : ‘घातक’, ‘घायल’, ‘अंदाज अपना अपना’ अशा दमदार चित्रपटांनी बॉलिवूड गाजवणारे दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल नऊ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. संतोषी यांचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचं नाव आहे, ‘गांधी-गोडसे एक युद्ध’.

Chinmay Mandlekar Gandhi Godse Ek Yudh Upcoming Movie Trailer out | Gandhi Godse – Ek Yudh Trailer : “गोडसे एका दिवसात बनता येतं, पण गांधी…” ‘गांधी गोडसे’चा ट्रेलर पाहिलात का?

Gandhi Godse – Ek Yudh Trailer : “गोडसे एका दिवसात बनता येतं, पण गांधी…” ‘गांधी गोडसे’चा ट्रेलर पाहिलात का?

googlenewsNext

Gandhi Godse – Ek Yudh Trailer : ‘घातक’, ‘घायल’, ‘अंदाज अपना अपना’ अशा दमदार चित्रपटांनी बॉलिवूड गाजवणारे दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi ) तब्बल नऊ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचं नाव आहे, ‘गांधी-गोडसे एक युद्ध’. मराठमोळा अभिनेता  चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar ) या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारताना दिसणार आहे.  काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली होती. आता या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

एका चिमुरड्याच्या रडण्याने ट्रेलरची सुरूवात होते. पाठोपाठ  'ज्या पाकिस्तान्यांनी हजारो हिंदू बांधवांची हत्या केली त्यांच्यासमोरच गुडघे टेकायला लावले या गांधीने...' हा चिन्मय मांडलेकरच्या आवाजातील एक संवाद ऐकू येतो.  संपूर्ण ट्रेलरमध्ये महात्मा गांधी आणि गोडसे यांच्यातील संवाद किंवा त्यांच्यातील वैचारिक मतभेद दाखवण्यात आले आहेत. चित्रपटात महात्मा गांधी यांची भूमिका दीपक अंतानी यांनी साकारली असून नथुराम गोडसेची भूमिका चिन्मय मांडलेकरने जिवंत केली आहे.     

राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा सिनेमा येत्या २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. 'गांधी गोडसे- एक युद्ध'च्या दिग्दर्शनासोबतच लेखनाची जबाबदारीही राजकुमार संतोषी यांनी उचलली आहे. शिवाय तेच या सिनेमाचे निर्माते आहेत. सिनेमाचं संगीत ए. आर. रहमान यांचे आहे. 

 ‘गांधी-गोडसे एका युद्ध’ या चित्रपटाद्वारे राजकुमार संतोषी हे तब्बल ९ वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहेत. २०१३मध्ये रिलीज झालेला ‘फटा पोस्टर निकला हिरो’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री इलियाना डिक्रूझ ही जोडी मुख्य भूमिकेत झळकली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. आता पुन्हा एकदा एक नाव विषय घेऊन राजकुमार संतोषी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Web Title: Chinmay Mandlekar Gandhi Godse Ek Yudh Upcoming Movie Trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.