Acharya Twitter Review: कसा आहे बाप-लेक चिरंजीवी-रामचरणचा ‘आचार्य’ सिनेमा? वाचा ट्विटरवरील पब्लिक रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 12:47 PM2022-04-29T12:47:53+5:302022-04-29T12:48:53+5:30

Chiranjeevi Ram Charan South Film Acharya Twitter Review:  या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा राम चरण आपल्या वडिलांसोबत म्हणजेच चिरंजीवीसोबत स्क्रीन शेअर करतोय. हीच या चित्रपटाची खास बात आहे आणि याचमुळे गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट जबरदस्त चर्चेत होता.

chiranjeevi ram charan south film acharya twitter review netizens disappointed | Acharya Twitter Review: कसा आहे बाप-लेक चिरंजीवी-रामचरणचा ‘आचार्य’ सिनेमा? वाचा ट्विटरवरील पब्लिक रिव्ह्यू

Acharya Twitter Review: कसा आहे बाप-लेक चिरंजीवी-रामचरणचा ‘आचार्य’ सिनेमा? वाचा ट्विटरवरील पब्लिक रिव्ह्यू

googlenewsNext

Chiranjeevi Ram Charan South Film Acharya Twitter Review:   साऊथ सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) व राम चरण (Ram Charan ) यांचा ‘आचार्य’ ( Acharya) हा तेलगू चित्रपट प्रदर्शित झालाय. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा राम चरण आपल्या वडिलांसोबत म्हणजेच चिरंजीवीसोबत स्क्रीन शेअर करतोय. हीच या चित्रपटाची खास बात आहे आणि याचमुळे गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट जबरदस्त चर्चेत होता. पण प्रत्यक्षात चित्रपट कसा आहे? तर ट्विटरवर अनेक चाहत्यांनी आपला रिव्ह्यू दिला आहे. तूर्तास तरी या चित्रपटानं चाहत्यांची निराशा केली, असं चित्र आहे.

दिग्दर्शक कोरताला शिवाचा हा अ‍ॅक्शन ड्रामा पाहून चाहते निराश आहे. हा चिरंजीवी व राम चरण यांचा आत्तापर्यंत सर्वात बेकार सिनेमा असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. 

काही युजर्सनी या चित्रपटाला मिळालेलं रेटिंग शेअर केलं आहे. एका युजरने या चित्रपटाला सुमार म्हणत, हा कोरताला शिवाचा आत्तापर्यंतचा सर्वात वाईट सिनेमा असल्याचं म्हटलं आहे.

एका युजरने या चित्रपटातील व्हिएफएक्स इफेक्टवर टीका केली आहे. चित्रपट बनवायला 2 वर्ष लागलीत आणि तरीही या चित्रपटातील व्हीएफएक्स इफेक्ट पाहून या युजरने निराशा व्यक्त केली आहे.

140 कोटींमध्ये बनला आचार्य
चिरंजीवी व राम चरण स्टारर ‘आचार्य’ या चित्रपटातील दमदार अ‍ॅक्शन सीन्सची जोरदार चर्चा होती. त्यामुळे चाहते चित्रपट पाहण्यास उत्सुक होते. 140 कोटी बजेट असलेला हा चित्रपट स्वत: राम चरणने प्रोड्यूस केला आहे. हा एक तेलगू सिनेमा आहे आणि तो फक्त तेलगू या एकाच भाषेत रिलीज झाला आहे.
 

Web Title: chiranjeevi ram charan south film acharya twitter review netizens disappointed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.