चिरंजीवी सरजा यांना त्यांच्या मृत्यूची लागली होती चाहूल, लॉकडाऊनमध्ये विविध गोष्टी करत कुटुंबासह आनंदात घालवला वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 10:50 AM2020-06-09T10:50:19+5:302020-06-09T10:56:13+5:30
लॉकडाऊनमध्ये त्याने आपल्या पत्नीला एक बाहुली भेट म्हणून दिली होती. ही पत्नीसाठी त्याची अखेरची भेट ठरली.
कन्नड चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे रविवारी 7 जून रोजी निधन झाले. हृदय विकाराच्या झटक्याने वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. चिरंजीवी यांच्या अकाली निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.
चिरंजीवी सरजाच्या निधनानंतर आता वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा सुरू आहे. अशात चिरंजीवीला त्याच्या मृत्यूची चाहूल लागली होती अशा चर्चा सध्या रंगत आहेत. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये तो आपल्या कुटुंबासह आनंदात आणि हसत-खेळत होता. लॉकडाऊनमध्ये त्याने आपल्या पत्नीला एक बाहुली भेट म्हणून दिली होती. ही पत्नीसाठी त्याची अखेरची भेट ठरली.
चिरंजीवी यांनी 2009 मध्ये वायूपूत्र या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता. तसेच त्यांनी 'अम्मा आय लव्ह यू', 'राम लीला', 'चंद्रलेखा', 'चिरु' या चित्रपटांसह एकुण 22 कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते.
2 मे 2018 रोजी कन्नड अभिनेत्री मेघना राजसोबत लग्न केले होते. चिरंजीवी यांची पत्नी मेघना गर्भवती आहे. तसेच ते दोघेही आपल्या पहिल्या बाळाच्या जन्माची वाट पाहात होते. बाळाचा चेहरा बघण्यापूर्वीच चिरंजीवीने जगाचा निरोप घेतला.