कोरिओग्राफर बॉस्कोची नवी इनिंग! सुरु झाली डान्स-हॉरर-कॉमेडीची तयारी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 02:49 PM2019-04-18T14:49:32+5:302019-04-18T15:03:18+5:30
बॉलिवूडमध्ये कोरिओग्राफर ते डायरेक्टर असा प्रवास करणा-यांमध्ये आणखी एक नाव सामील झाले आहे. होय, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर बॉस्को-सीजर लवकरच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात नशीब आजमावतोय.
बॉलिवूडमध्ये कोरिओग्राफर ते डायरेक्टर असा प्रवास करणा-यांमध्ये आणखी एक नाव सामील झाले आहे. होय, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस लवकरच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात नशीब आजमावतोय.
झी स्टुडियोसोबत मिळून बास्को एक डान्स-हॉरर कॉमेडी चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. साहजिकच बॉस्को या नव्या इनिंगसाठी कमालीची उत्सुक आहे.
IT'S OFFICIAL... Ace choreographer Bosco [of Bosco-Caesar] turns director... Will make dance-horror film with dollops of comedy [not titled yet]... In 3D... Zee Studios in-house production... Cast not finalized... Starts second half of the year. pic.twitter.com/oxpIJF5zkh
— taran adarsh (@taran_adarsh) April 18, 2019
आपल्या या नव्या इनिंगबद्दल बोलताना त्याने सांगितले की, ‘ एक कोरिओग्राफर असलो तरी एक आगळावेगळा चित्रपट बनवण्याचे माझे पूर्वापार स्वप्न होते. याचमुळे मी एका डान्स हॉरर कॉमेडी चित्रपटाची निवड केली. डान्स हॉरर कॉमेडी सिनेमाकडे आत्तापर्यंत जगभरातील दिग्दर्शकांनी दुर्लक्ष केले. बॉलिवूडसाठी तर ही अगदीच अनोखी कल्पना आहे. त्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे.’
बॉस्कोचा हा चित्रपट एक बिग बजेट चित्रपट असल्याचे कळतेय. ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोच्या काही प्रतिभावान कलाकारांना या चित्रपटात संधी देण्याचाही विचार सुरु आहे. तुम्हाला ठाऊक असेल की, बॉस्को ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोचा जज म्हणून दिसणार आहे.
आत्तार्यंत फराह खान, प्रभुदेवा, रेमो डिसुजा अशा अनेक कोरिओग्राफर्सनी दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यांचे हे पदार्पण कमालीचे यशस्वी ठरले. आता बॉस्कोचे दिग्दर्शक म्हणून होत असलेले पदार्पण किती यशस्वी ठरते ते बघूच. बॉस्को मार्टिस हा बॉलिवूडचा लोकप्रिय कोरिओग्राफर आहे. बॉस्कोने सर्वप्रथम एका अवार्ड फंक्शनमध्ये शान आणि सागरिकाचा डान्स कोरिओग्राफ केला होता. यानंतर २००० मध्ये आलेल्या ‘मिशन काश्मीर’ या चित्रपटातून त्याला बे्रक मिळाला. या चित्रपटातील ‘रिंद पोश माल गिंदने द्राये लो लो’ हे गाणे कोरिओग्राफ करण्याची संधी त्याला मिळाली.