कोरिओग्राफर प्रभु देवा पुन्हा प्रेमात, लवकरच शुभमंगल सावधान!!

By रूपाली मुधोळकर | Published: November 13, 2020 10:32 AM2020-11-13T10:32:56+5:302020-11-13T10:46:29+5:30

कोणाला डेट करतोय प्रभु, चर्चांना उधाण

choreographers prabhu deva will to tie the knot with his niece | कोरिओग्राफर प्रभु देवा पुन्हा प्रेमात, लवकरच शुभमंगल सावधान!!

कोरिओग्राफर प्रभु देवा पुन्हा प्रेमात, लवकरच शुभमंगल सावधान!!

googlenewsNext
ठळक मुद्दे2011 मध्ये त्याने पत्नी लताला घटस्फोट दिला होता. यादरम्यान प्रभुदेवा व अभिनेत्री नयनतारा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या

 अभिनेता आणि बॉलिवूडचा टॉप कोरिओग्राफर प्रभु देवाला भारताचा ‘मायकल जॅक्सन’ म्हणूनही ओळखले जाते. हाच प्रभु देवा सध्या प्रेमात पडला आहे. होय, प्रभु देवा लवकरच दुसरे लग्न करणार असल्याची चर्चा जोरात आहे. 2011 मध्ये त्याने पत्नी लताला घटस्फोट दिला होता. यादरम्यान प्रभुदेवा व अभिनेत्री नयनतारा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. खरे तर नयनतारा हिच्यासाठीच प्रभुदेवाने पत्नीला घटस्फोट दिला होता. मात्र ऐनवेळी नयनताराने प्रभुला लग्नासाठी नकार दिला होता.


 

नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, प्रभु देवा आपल्या भाचीला डेट करत असल्याचे मानले जात आहे आणि लवकरच हे दोघे लग्न करणार असल्याचीही खबर आहे. अर्थात अद्याप प्रभु देवा वा त्याच्या टीमने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
प्रभु देवा सध्या सलमान खानच्या ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड’ या सिनेमाच्या दिग्दर्शनात बिझी आहे.   लवकरच तो एका तामिळ सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. अभिनेता म्हणून प्रभु देवाचा हा 50वा सिनेमा आहे. या चित्रपटाचे नाव ‘पोन मनिकवेल’ असे आहे.  
 प्रभू देवाचे खरे नाव शंकुपानी असे असून आज त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. त्याला भारताचा मायकल जॅकसन म्हटले जाते. प्रभू देवाचा जन्म हा कर्नाटकमधील मैसूर येथील आहे. त्याचे वडील मुगूर सुंदर हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर होते. त्याने त्यांच्याकडूनच लहानपणापासून नृत्याचे धडे गिरवले. 


प्रभू देवाचे वडील कोरिओग्राफर असले तरी त्याने त्यांची मदत कधीच घेतली नाही. करियरच्या सुरुवातीला अतिशय छोट्या भूमिकांमध्ये देखील तो झळकला. मौना रगम या चित्रपटाद्वारे त्याने या क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात केवळ एका गाण्यात काही क्षणांसाठी बासरी वाजवताना तो दिसला होता. त्यानंतर अग्नी नातचथिरम या चित्रपटात तो बॅकग्राऊंड डान्सर म्हणून झळकला. कमल हासनच्या वेत्री विज्हा या चित्रपटात त्याला पहिल्यांदा डान्स कोरिग्राफ करण्याची संधी मिळाली. कोरिग्राफी करत असतानाच तो अभिनयक्षेत्राकडे वळला. 

 अधुरी एक कहाणी...!

प्रभुदेवाचे पहिले लग्न लता सोबत झाले. त्या दोघांना तीन मुले असून त्यांच्या सगळ्यात मोठ्या मुलाचे निधन 2008 मध्ये कॅन्सरने झाले. त्यानंतर दोनच वर्षांत प्रभू देवा आणि अभिनेत्री नयनतारा यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू झाली.

नयनतारा व प्रभूदेवा एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा प्रभूदेवा विवाहित होता. तीन मुलांचा बाप होता. पण प्रेम आंधळे असते, त्यानुसार पत्नी व मुलांना सोडून प्रभूदेवा नयनतारासोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागला. प्रभूदेवाची पत्नी लताला ही गोष्ट कळली आणि तिने थेट फॅमिली कोर्टात धाव घेतली. नयनताराने माझ्या पतीशी लग्न केले तर मी उपोषणावर बसेल, अशी धमकीही लताने दिली. या प्रकरणाचा इतका बोभाटा झाला की, रस्त्यावर नयनताराचे पुतळे जाळले गेलेत. यातून सहीसलामत सुटण्यासाठी  आमच्यात असे काहीही नाही, असे  नयनताराने  अगदी शिरजोरपणे सांगितले होते. पण प्रभूदेवापासून दूर राहणे नयनताराला शक्य नव्हते.  प्रभूदेवासोबत लग्न करण्यासाठी तिने ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्मही स्विकारला होता. 

 अखेर नयनतारासाठी प्रभूदेवाने एक मोठा निर्णय घेतला. पत्नीसोबतचे १६ वर्षांचे नाते तोडत २०११ मध्ये त्याने पत्नीला घटस्फोट दिला. यापोटी प्रभूदेवाला   १० लाख रूपये, शिवाय २० ते २५ कोटींची प्रॉपर्टी शिवाय दोन कार असे सगळे पत्नीला द्यावे लागले. यामुळे नयनताराचे प्रेम आपल्याला मिळेल, असा त्याचा अंदाज होता. पण त्याचा हा अंदाज फसला. जिच्याशी लग्न करण्यासाठी प्रभुदेवाने पत्नीला सोडले त्या नयनताराने २०१२ मध्ये प्रभूदेवासोबतचे नाते संपल्याचे जाहीर केले.

कधी प्रभुदेवावर भाळली होती नयनतारा आता विग्नेशच्या प्रेमात झालीय वेडी, पाहा Romantic फोटो

प्रभू देवाने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती सुरुवात, आज कमवतोय करोडोने

Web Title: choreographers prabhu deva will to tie the knot with his niece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.