Chrisann Pereira: ड्रग्स प्रकरणी चर्चेत आलेल्या क्रिसॅन परेराचं भारतात येणं मुश्किल.. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी दिली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 01:15 PM2023-05-03T13:15:21+5:302023-05-03T13:24:15+5:30
क्रिसॅन ही भारतात कधी येणार? याबाबत अनेकजण वाटत होते. पण आता या प्रकरणात एक मोठी अपडेट आली असून तिच्या कुटुंबियांनी एक महत्वाची माहिती दिली आहे.
'सडक 2' सिनेमातील सहाय्यक अभिनेत्री क्रिसॅन परेराची (Chrisann Pareira) दुबईच्या तुरुंगातून सुटका झाली. सुमारे एक महिना ती दुबईच्या शारजाह जेलमध्ये होती. ड्रग्स तस्करी प्रकरणात ती अडकली होती. जशीजशी प्रकरणाची चौकशी झाली तेव्हा तिला शेजाऱ्यांनीच फसवलं असल्याचं उघड झालं. तिला या प्रकरणाची काहीच कल्पना नव्हती हे समोर आलं आणि तिची सुटका झाली. आता ती लवकरच भारतात येणार आहे. क्रिसॅन ही भारतात कधी येणार? याबाबत आता तिच्या कुटुंबियांनी माहिती दिली आहे.
क्रिसॅन ही भारतात कधी येणार? याबाबत अनेकजण वाटत होते. पण आता या प्रकरणात एक मोठी अपडेट आली असून तिच्या कुटुंबियांनी एक महत्वाची माहिती दिली आहे.
क्रिसनच्या कुटुंबीयांनी तिच्या चाहत्यांना सांगितले की, सध्या क्रिसॅन तिथे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करते आहे. ती प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय ती भारतात येऊ शकत नाही. त्यामुळे तिला भारतात परत येण्यासाठी तिला कमीत-कमी दोन ते जास्तीत जास्त तीन आठवडे लागू शकतात. ती भारतात सुखरूप परत येईपर्यंत तिच्यासाठी प्रार्थना करा. धन्यवाद.'
का आहे प्रकरण?
क्रिसॅनची आई प्रेमिला परेरा यांनी सांगितले, “क्रिसन इंटरनॅशनल वेब सीरिज करण्यासाठी तयार आहे का?” असं विचारलं होतं. त्यानंतर दुबईला ऑडिशन देण्यासाठी क्रिसनसाठी जाण्यास सांगण्यात आलं होतं. १ एप्रिलला क्रिसन दुबईसाठी निघण्याच्या पूर्वी त्या व्यक्तीने तिला मुंबई विमानतळापासून १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका कॉफी शॉपमध्ये भेटण्यासाठी बोलवलं होतं. त्या व्यक्तीने क्रिसनला एक ट्रॉफी देत ती ऑडिशनसाठी महत्त्वाची असल्याचं सांगितलं. अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी क्रिसॅन परेराला शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आणि नंतर शारजा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते
यानंतर या प्रकरणात तिला फसवणाऱ्या मुंबईचे रहिवासी एंथनी पॉल आणि राजेश बुवतला अटक करण्यात आली आहे. पॉल यांचे मालाडमध्ये बेकरी शॉप आहे. तर राजेश बँकेत सहायक प्रबंधक आहेत.