"50 हजार रुपये दिले आणि...", चंकी पांडेनं शेअर केला शक्ती कपूरचा मजेशीर किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 09:47 AM2024-12-02T09:47:52+5:302024-12-02T10:14:05+5:30
चंकी पांडेने खलनायक शक्ती कपूरची मजेदार आठवण सांगितली.
अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायक आणि कॉमेडियनच्या भूमिकेसाठी शक्ती कपूरला ओळखले जातं. चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका करूनच त्यांनी लोकप्रियता मिळवली. त्याच्या पात्रांशी संबंधित रंजक किस्सेही बॉलिवूडमध्ये ऐकायला मिळतात. अलीकडेच 'द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2' मध्ये शक्ती कपूर, चंकी पांडे आणि गोविंदा हे सहभागी झाले होते. यावेळी चंकी पांडेने खलनायक शक्ती कपूरची एक किस्सा शेअर केला.
90 च्या दशकात शक्ती कपूर यांच्या खलनायकी इमेजची चर्चा होती. एक किस्सा सांगताना शक्ती कपूर म्हणाले, "त्यावेळी माझ्या नकारात्मक भूमिका जास्त लोकप्रिय होत्या आणि मी खलनायकाची भूमिका करायची नाही, असे ठरवले होते. जख्मी इंसान या चित्रपटात मी मुख्य अभिनेत्याची भूमिका केली होती. मात्र, या चित्रपटाने निर्माता, दिग्दर्शक आणि प्रेक्षक जखमी झाले. हा पहिला चित्रपट असेल जो 12 वाजता थिएटरमध्ये उघडला गेला आणि 12:15 वाजता काढला गेला. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर मी पुन्हा खलनायकाच्या भूमिकेत काम करायला सुरुवात केली". यावेळी शक्ती कपूरला मध्येच थांबवत चंकी पांडेने एक आठवण सांगितली.
शक्ती कपूरने एका अभिनेत्याला खलनायकाची भूमिका करण्यापासून रोखल्याचं चंकी पांडेने सांगितलं. त्या अभिनेत्याने खलनायकाची भुमिका करू नये म्हणून त्याला शक्ती कपूरने थेट ५० हजार रुपये देत सिनेमात हिरो म्हणून घेत असल्याचं सांगितलं होतं. चंकी पांडे म्हणाला, "शक्ती कपूरने एका अभिनेत्याला खलनायकाची भूमिका करण्यापासून रोखले होते. कारण तो त्याची जागा घेण्याचा प्रयत्न करत होता. यासाठी शक्ती कपूरनं संबंधित अभिनेत्याला ५० हजार रुपये दिले आणि खलनायकाची भूमिका न करण्यास सांगितले होते". चंकी पुढे म्हणाला, "शक्तीने अभिनेत्याला सांगितले की तो त्याला चित्रपटात अभिनेता म्हणून घेत आहे'. यावर शक्ती कपूरने लगेच उत्तर दिले की, "हे खोटे आहे". यानंतर सगळेच हसायला लागले.