नवीन वर्षातला पहिला 'सिनेमा लव्हर डे', 'या' तारखेला कोणताही सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयांत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:43 IST2025-01-14T12:43:37+5:302025-01-14T12:43:55+5:30
२०२५ अर्थात नवीन वर्षातला 'सिनेमा लव्हर डे' कधी बघायला मिळणार? जाणून घ्या (cinema lover day)

नवीन वर्षातला पहिला 'सिनेमा लव्हर डे', 'या' तारखेला कोणताही सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयांत
तर लोकमतच्या वाचकांनो! तुमच्यासाठी आनंदाची बातमी. ज्याची सर्वांच्या मनात उत्सुकता होती तो दिवस आला आहे. अर्थात 'सिनेमा लव्हर डे'. थिएटरमध्ये स्वस्तात मस्त सिनेमे पाहण्याचा एक दिवस. सर्वजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या वर्षी २०२४ मध्ये दर दोन - तीन महिन्यांनी एक 'सिनेमा लव्हर डे' साजरा केला जायचा. आता नवीन वर्षात अर्थात २०२५ मधील पहिल्या 'सिनेमा लव्हर डे'ची घोषणा झालीय. कधी आहे हा दिवस? जाणून घ्या.
'सिनेमा लव्हर डे' कधी?
२०२५ अर्थात नवीन वर्षातला पहिला 'सिनेमा लव्हर डे' या शुक्रवारी म्हणजेच १७ जानेवारीला साजरा केला जाणार आहे. या दिवशी तुम्हाला कोणताही सिनेमा फक्त ९९ रुपयांमध्ये थिएटरमध्ये बघता येणार आहे. देशभरातील ४००० सिनेमागृहांमध्ये १७ जानेवारीला ९९ रुपयांत सिनेमा पाहण्याची ऑफर लागू आहे. केवळ 3D, रिक्लायनर सिनेमा स्क्रीन्समध्ये ही ऑफर लागू नाहीय. त्यामुळे या शुक्रवारी १७ जानेवारीला प्रेक्षकांना स्वस्तात मस्त केवळ ९९ रुपयांमध्ये सिनेमा पाहण्याची संधी आहे.
या सिनेमांना होणार फायदा
२०२५ नवीन वर्षातल्या पहिल्या 'सिनेमा लव्हर डे'मुळे पुढील सिनेमांना फायदा होईल. मराठीतील 'संगीत मानापमान' आणि 'मु.पो.बोंबीलवाडी' या सिनेमांच्या कमाईत 'सिनेमा लव्हर डे'मुळे वाढ होण्याची शक्यता आहे. तर 'पुष्पा २'चं नवीन रिलोडेड व्हर्जन रिलीज होणारेय. त्यामुळे 'पुष्पा २'च्या कमाईत 'सिनेमा लव्हर डे'मुळे पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कंगना राणौतचा बहुचर्चित 'इमर्जन्सी' सिनेमा रिलीज होणार आहे. याशिवाय अजय देवगणचा 'आझाद' सिनेमाही १७ जानेवारीला रिलीज होतोय. त्यामुळे याही सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल.