Circus Movie : 'सुन जरा' सर्कस सिनेमातील गाणं उद्या रिलीज होणार; प्रोमो आहे खूपच खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 15:54 IST2022-12-15T15:52:25+5:302022-12-15T15:54:44+5:30
रोहित शेट्टीच्या सर्कस सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. आता सिनेमातील पहिले गाणे उद्या रिलीज होत आहे. त्याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

Circus Movie : 'सुन जरा' सर्कस सिनेमातील गाणं उद्या रिलीज होणार; प्रोमो आहे खूपच खास
Circus Movie : रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि त्याचा सिम्बा रणवीर सिंग (Ranveer Singh) ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. सिम्बा आणि सूर्यवंशीनंतर आता हे दोघेही लवकरच 'सर्कस' (Cirkus Movie) चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. आता सिनेमातील पहिले गाणे उद्या रिलीज होत आहे. त्याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
'सुन जरा' 60s थीमवर आधारित गाणं
सर्कस सिनेमातील पहिले गाणे 'सुन जरा' हे उद्या रिलीज होत आहे. आज त्याचा प्रोमो समोर आला असून गाण्यात 60s ची थीम दिसत आहे. रणवीर सिंग, जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडे यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. तिघांची स्टाईल ही ६० च्या दशकातील सेलिब्रिटींसारखी आहे. नेहमीप्रमाणेच सुंदर लोकेशन वर गाणं शूट करण्यात आले आहे.
रोहीत शेट्टी दिग्दर्शित सर्कस हा चित्रपट २३ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. यामध्ये पुजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, सिद्धार्थ जाधव, वरुण शर्मा, जॉनी लिव्हर यांचीही भुमिका आहे. तर दीपिका पदुकोणचा यात कॅमिओ असणार आहे.