वृद्ध दांम्पत्याने केला दावा; म्हणे धनुष आमचा पळून गेलेला मुलगा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2016 01:38 PM2016-11-27T13:38:50+5:302016-11-27T13:38:50+5:30
रजनीकांतचा जावई आणि ‘रांझणा’फेम अभिनेता धनुष सध्या अडचणीत आलाय. होय, धनुष हा आपला मुलगा आहे, असा दावा मलमपट्टी येथे ...
र नीकांतचा जावई आणि ‘रांझणा’फेम अभिनेता धनुष सध्या अडचणीत आलाय. होय, धनुष हा आपला मुलगा आहे, असा दावा मलमपट्टी येथे राहणाºया एका म्हाता-या दांम्पत्याने केला आहे. याप्रकरणी मदुराईच्या एका न्यायालयाने धनुषला समन्स जारी केला आहे. या समन्सनुसार, येत्या १२ जानेवारीला धनुषला न्यायालयात हजर व्हावे लागेल. धनुष हा आपला मुलगा आहे, असा दावा करणाºया या दांम्पत्याने नाव आहे कातिरेशन व मीनाक्षी. या दांम्पत्याने धनुषचे काही लहानपणीचे फोटो आणि जन्मतारखेचा दाखला दाखवत, धनुष हा आपलाच मुलगा असल्याचा दावा केला आहे. धनुष हा अभ्यासात कच्चा होता. त्यामुळे २००२ साली तो पळून गेला. यानंतर तो धनुष नावाने चित्रपटात काम करू लागला. त्याचे नाव कलाईसेल्वम आहे. त्याने मेलूरमध्ये आर सी हायर सेकेंडीरी स्कूल व गव्हर्नमेंट बॉईज हायर सेकेंडरी स्कूलमध्ये त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले, असा दावा या दांम्पत्याने केला आहे. अभिनेता झाल्यानंतर धनुष कधीही आम्हाला भेटायला आला नाही. आम्ही एकदा स्वत: चेन्नईत भेटायला गेलो. पण आम्हाला त्याला भेटू देण्याऐवजी हाकलून लावण्यात आले, असेही या दांम्पत्याने म्हटले आहे.
कातिरेशन हे निवृत्त बस कंडक्टर आहेत. जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या स्पेशल सेलकडे त्यांनी आपला मुलगा धनुष परत मिळावा,अशी विनवणी केली आहे. केवळ एवढेच नाही मुलगा या नात्याने धनुषने उदरनिर्वाहासाठी दरमहा ६५ हजार रुपए द्यावेत, अशीही मागणी केली आहे. मेलुरच्या न्यायालयाने याप्रकरणी धनुषला समन्स जारी केला आहे. निश्चिपणे या प्रकरणाचा सोक्षमोक्ष काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.