VIDEO: सुशांत सिंग राजपूत प्रकरणी क्लीन चीट, रिया चक्रवर्ती सहकुटुंब पोहोचली सिद्धिविनायक मंदिरात, घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:17 IST2025-03-24T17:14:14+5:302025-03-24T17:17:35+5:30

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूचं प्रकरण गेली अनेक वर्ष सातत्याने चर्चेत आहे.

clean chit in sushant singh rajput case rhea chakraborty and family reach siddhivinayak temple took blessings | VIDEO: सुशांत सिंग राजपूत प्रकरणी क्लीन चीट, रिया चक्रवर्ती सहकुटुंब पोहोचली सिद्धिविनायक मंदिरात, घेतलं दर्शन

VIDEO: सुशांत सिंग राजपूत प्रकरणी क्लीन चीट, रिया चक्रवर्ती सहकुटुंब पोहोचली सिद्धिविनायक मंदिरात, घेतलं दर्शन

Reha Chakraborty: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूचं प्रकरण गेली अनेक वर्ष सातत्याने चर्चेत आहे. १४ जून २०२० रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आला होता, अभिनेत्याच्या मृत्यूने सर्वत्र एकच खळबळ माजली होती. तसेच या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर संशय होता, त्यामुळे तिला अटकही करण्यात आली होती. नुकताच सीबीआयने या प्रकरणाबाबत अंतिम अहवाल सादर केला आहे. सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू ही आत्महत्या आहे, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे. त्यामुळे रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि इतर आरोपींना या प्रकरणातून क्लीन चीट देण्यात आली आहे. अशातच अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. 


सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी क्लीन चीट मिळाल्यानंतर रिया चक्रवर्ती सहकुटुंब मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. गेली अनेक वर्ष रिया चक्रवर्ती सुशांत सिंग राजपूत केस प्रकरणी प्रचंड मानसिक त्रास सहन लागला. त्यानंतर आता या प्रकरणी मोठा निकाल समोर आला. त्यानंतर आता अभिनेत्री गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाल्याची पाहायला मिळतेय. या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

दरम्यान, सुशांत सिगं राजपूत मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्ती हिच्यावर आरोप लावले होते, मात्र त्यात पुरावे आढळले नाहीत. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाने सुशांत सिंह राजपूतच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबाने केला होता. या काळात रियाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सपोर्ट केला. 

Web Title: clean chit in sushant singh rajput case rhea chakraborty and family reach siddhivinayak temple took blessings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.