निमरत कौरसोबत अफेअरची चर्चा होऊनही अभिषेक गप्प का? बच्चन कुटुंबाच्या निकटवर्तियाचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 02:52 PM2024-11-06T14:52:15+5:302024-11-06T14:57:47+5:30
बच्चन कुटुंब कायदेशीर कारवाई करणार?
बच्चन कुटुंब बॉलिवूडमधील प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या कुटुंबात सारं काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. याचं कारण म्हणजे ऐश्वर्या लेक आराध्यासह बच्चन कुटुंबापासून वेगळी झाली आहे. तिच्यात आणि अभिषेकमध्ये दुरावा आल्याची चर्चा आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चनचं (Abhishek Bachchan) नाव अभिनेत्री निमरत कौरसोबत जोडलं जात आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची चर्चा होऊनही अभिषेक बच्चनने मात्र मौन का बाळगलं आहे यावर नुकतंच बच्चन कुटुंबाच्या निकटवर्तियाने भाष्य केलं.
निमरत कौरने अभिषेक बच्चनसोबत 'दसवी' सिनेमात स्क्रीन शेअर केली होती. अभिषेकसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर निमरतने काही दिवसांपूर्वी भाष्यही केलं होतं. तिने या अफवा पसरवणाऱ्यांना खडेबोल सुनावले. पण दुसरीकडे अभिषेक बच्चनने मात्र शांत राहणंच पसंत केलं आहे. आता यावर बच्चन कुटुंबाच्या निकटवर्तियाने 'टाइम्स नाऊ'ला सांगितले की, "निमरत आणि अभिषेकच्या चर्चा या अफवा आहेत. हे सर्व बकवास आहे. निमरत या चर्चांवर का बोलत आहे मला माहित नाही. अभिषेकने अद्याप यावर मौन धारण केलं आहे कारण त्याच्या आयुष्यात आधीच खूप काही घडत आहे. त्याला कोणत्याही वादापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे."
ते पुढे म्हणाले,"या अफेअरच्या चर्चांचा उगम कुठून झाला याचा शोध घेतला पाहिजे. अभिषेक पत्नीला धोका देणाऱ्यांमधला नाही. तो पूर्ण प्रामाणिक आहे. या सर्व अफवांमुळे बच्चन कुटुंब नाराज आणि हैराण आहे. ते शांत आहेत मात्र त्यांना हलक्यात घेऊ नका. या अफवा पसरवणाऱ्यांना ते शोधत आहेत आणि कायदेशीर कारवाई करण्याच्याही तयारित आहेत."