अजय-अतुलच्या सुरांची मैफिल ते सलमान, शाहरुख, माधुरी अन्...; CM देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला सेलिब्रिटींची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 17:36 IST2024-12-05T17:36:17+5:302024-12-05T17:36:55+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचं जंगी आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शविली आहे.

cm devendra fadnavis take oath ajay atul shah rukh khan madhuri dixit ranveer singh salman khan attended ceremony | अजय-अतुलच्या सुरांची मैफिल ते सलमान, शाहरुख, माधुरी अन्...; CM देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला सेलिब्रिटींची मांदियाळी

अजय-अतुलच्या सुरांची मैफिल ते सलमान, शाहरुख, माधुरी अन्...; CM देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला सेलिब्रिटींची मांदियाळी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महायुतीने (Mahayuti) अखेरीस सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आज (०५ डिसेंबर २०२४ ) मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा भव्य शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचं जंगी आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शविली आहे. हजारोंच्या संख्येने नेते, कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आहे. तर या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रित करण्यात आलं आहे. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यातील काही दृश्ये समोर आली आहेत. मराठीतील सुप्रसिद्ध गायक अजय-अतुल यांच्या सुरेल आवाजाने या सोहळ्याची रंगत वाढवली. 

या सोहळ्याला बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितनेही हजेरी लावली आहे. माधुरीने पती डॉ. नेने यांच्यासह उपस्थिती दर्शविली. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यानेही या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. 

या सोहळ्यासाठी संजय दत्तनेही हजेरी लावली. भाईजान सलमान खानही या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहे. 

शाहरुख खानदेनेदेखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. 

दरम्यान,  देवेंद्र फडणवीस यांच्यासह आज अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्री, अन्य राज्यांचे मंत्री, अनेक दिग्गज मंडळी, संत-महंत, लाडक्या बहिणी, शेतकरी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित आहेत. 

Web Title: cm devendra fadnavis take oath ajay atul shah rukh khan madhuri dixit ranveer singh salman khan attended ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.