पहिल्या पोस्टरनेचं निर्माण केला वाद! अखेर ‘जिला गोरखपूर’बंद!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 11:05 PM2018-07-31T23:05:23+5:302018-07-31T23:11:12+5:30

उत्तरप्रदेशच्या राजकीय कुरघोडींवर भाष्य करणारा ‘जिला गोरखपूर’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर जारी झाले आणि हा चित्रपट सापडला. या वादाचा परिणाम म्हणजे, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने हा चित्रपटचं बनवणार नसल्याचे जाहिर केले.

cm yogi adityanath biopic zila gorakhpur will not release now | पहिल्या पोस्टरनेचं निर्माण केला वाद! अखेर ‘जिला गोरखपूर’बंद!!

पहिल्या पोस्टरनेचं निर्माण केला वाद! अखेर ‘जिला गोरखपूर’बंद!!

googlenewsNext

उत्तरप्रदेशच्या राजकीय कुरघोडींवर भाष्य करणारा ‘जिला गोरखपूर’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर जारी झाले आणि हा चित्रपट सापडला. या वादाचा परिणाम म्हणजे, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने हा चित्रपटचं बनवणार नसल्याचे जाहिर केले. हा चित्रपट उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचे मानले गेले होते. गत शनिवारी याचे पहिले पोस्टर रिलीज झाले आणि वादाने तोंड काढले. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक व्यक्ती पाठमोरी उभी दिसली होती.  केशरी रंगाची शाल अंगावर ओढलेल्या या व्यक्तीचे हात मागे असून, त्यात बंदुक दाखवण्यात आली होती. गंगा नदीच्या किना-याकडे एकटक पाहणा-या त्या व्यक्तीचा चेहरा दाखवला गेला नव्हता. पण, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीनवावर आधारित काही प्रसंगांचे चित्रण या चित्रपटातून करण्यात येणार असल्याचे म्हटले गेले आणि विरोधाचे सूर उमटू लागलेत. त्यातच मेरठचे भाजपा आमदार सोमेंद्र तोमर यांनी या चित्रपटाच्या निर्माता व दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल केला.
चित्रपटाचे हे पोस्टर धार्मिक भावना दुखावणारे शिवाय समाजात चुकीचा संदेश देणारे असल्याचे तोमर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले, हा वाद चिघळण्याची चिन्हे दिसताच, दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी आपण हा चित्रपट बंद करत असल्याची घोषणा केली.



 ‘माझा चित्रपट ‘जिला गोरखपूरची घोषणा होताच, त्यावरून वाद सुरू झालेत. सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल अपप्रचार सुरू झाला. कुणाच्याही भावना दुखावण्याचा वा समाजात दहशत निर्माण करण्याचा माझा कुठलाही उद्देश नाही. त्यामुळे समाजहिताच्या दृष्टीने मी माझा हा प्रोजेक्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे’ असे त्यांनी सोशल मीडियावर जाहिर केले.

 

 

Web Title: cm yogi adityanath biopic zila gorakhpur will not release now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.