अभिषेक बच्चनची नवी वेबसीरिज ‘ब्रीद..’ मधील सहकलाकारांनाही करावी लागणार कोरोना टेस्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 06:16 PM2020-07-12T18:16:32+5:302020-07-12T18:17:16+5:30

नुकताच एक सुप्रसिद्ध अभिनेता अमित साधनेही कोरोना चाचणी केल्याचे सांगितले आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांना आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे

Co-stars in Abhishek Bachchan's new webseries 'Breath ..' will also have to do a corona test! | अभिषेक बच्चनची नवी वेबसीरिज ‘ब्रीद..’ मधील सहकलाकारांनाही करावी लागणार कोरोना टेस्ट!

अभिषेक बच्चनची नवी वेबसीरिज ‘ब्रीद..’ मधील सहकलाकारांनाही करावी लागणार कोरोना टेस्ट!

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय अभिनेता अनुपम खेर यांच्याही घरातील ४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, नुकताच एक सुप्रसिद्ध अभिनेता अमित साधनेही कोरोना चाचणी केल्याचे सांगितले आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांना आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे आणि त्यासोबतच लवकरच कोरोना टेस्ट होणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.

अमित साध याने अभिषेक बच्चनसोबत नुकतीच रिलीज झालेली वेब सीरिज ‘ब्रीथ: इन शेडोज’ मध्ये सह-कलाकाराचे काम केले आहे. अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर अमित साधची कोरोना टेस्ट होणार आहे. सोशल मीडियातील बऱ्याच लोकांनी त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे सर्वांनाच मोठा झटका बसला आहे.

बॉलिवूडचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही पिता-पुत्रांना मुंबईतल्या नानावटी हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Read in English

Web Title: Co-stars in Abhishek Bachchan's new webseries 'Breath ..' will also have to do a corona test!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.