मेरे साथ भाग चलो...! सुश्मिता सेन - रोहमन शॉलचे ‘लव्ह इन न्यूयॉर्क’!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 12:39 PM2019-04-26T12:39:35+5:302019-04-26T12:40:35+5:30
सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल एकमेकांच्या प्रेमात अक्षरश: वेडे झाले आहेत. अगदी जगाचा विसर पडावा, इतके वेडे. कदाचित म्हणूनच जगाच्या नजरेपासून दूर प्रेमाच्या दुनियेत पळून जाण्याची घाई दोघांनाही झालीय.
ठळक मुद्देगतवर्षी एका पार्टीत सुश्मिता व रोहमन एकमेकांना भेटले आणि पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले.
सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल एकमेकांच्या प्रेमात अक्षरश: वेडे झाले आहेत. अगदी जगाचा विसर पडावा, इतके वेडे. कदाचित म्हणूनच जगाच्या नजरेपासून दूर प्रेमाच्या दुनियेत पळून जाण्याची घाई दोघांनाही झालीय. विश्वास बसत नसेल तर सुश्मिता आणि रोहमनच्या ताज्या पोस्ट तुम्ही बघायलाच हव्यात.
सुश्मिता व रोहमन सध्या न्यूयॉर्क ट्रिपवर आहेत. सुश्मिताने या ट्रिपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यापैकी एका फोटोत सुश रोहमनसोबत न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर धावताना दिसतेय. ‘चल, माझ्यासोबत पळून चल...’, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
सुश्मिताने इतकी गोड मागणी केल्यावर रोहमन आपल्या भावना कशा आवरणार? त्यानेही चल, पळून जाऊ यात...., अशा शब्दांत तिला उत्तर दिलेय. तुझ्यासोबत असताना मी सर्वाधिक आनंदात असतो. अशा वेड्यागत गोष्टी करायला तू मला भाग पडते आणि आश्चर्य म्हणजे, आता मलाही असे वेड्यासारखे वागणे आवडू लागलेय, असेही रोहमनने लिहिले आहे.
एकंदर काय तर सुश्मिता आणि रोहमन एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेत, हेच त्यांच्या या पोस्टवरून दिसतेय.
गतवर्षी एका पार्टीत सुश्मिता व रोहमन एकमेकांना भेटले आणि पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले. रोहमन सुश्मितापेक्षा १६ वर्षांनी लहान आहे. पण वयाचे अंतरही त्यांच्या प्रेमात अडसर ठरले नाही. गेल्या काही महिन्यात दोघांची जवळीक कमालीची वाढलीय. सुश्मिताच्या मुलींसोबत वेळ घालवण्यापासून तर तिच्या फॅमिली फंक्शनमध्ये रोहमन हमखास दिसतो. या दोघांमधील वाढती जवळीक पाहता दोघेही लवकरच लग्न करतील असा अंदाज लावला जात आहे.