Video: "कपिल शर्मा इतका बारीक कसा झाला?" अभिनेत्याचा मंदिरातील व्हिडीओ बघून चाहते हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 13:53 IST2025-03-09T13:53:19+5:302025-03-09T13:53:40+5:30

कपिल शर्माने पुन्हा घटवलं वजन. अभिनेत्याचा शारीरिक बदल बघून सर्व थक्क

comedian kapil sharma weight lose transformation video at shiv mandir bhojpur | Video: "कपिल शर्मा इतका बारीक कसा झाला?" अभिनेत्याचा मंदिरातील व्हिडीओ बघून चाहते हैराण

Video: "कपिल शर्मा इतका बारीक कसा झाला?" अभिनेत्याचा मंदिरातील व्हिडीओ बघून चाहते हैराण

कॉमेडीयन कपिल शर्मा (kapil sharma) हा सर्वांचा लाडका अभिनेता. कपिलला आपण गेली अनेक वर्ष टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवताना पाहिलंय. कपिलच्या दिलखुलास, मनमिळाऊ स्वभावामुळे तो सेलिब्रिटींचाही फेव्हरेट अभिनेता आहे. अशातच कपिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात कपिल प्रचंड बारीक झालेला दिसतोय. कपिलचं बदललेलं हे रुप त्याचे चाहते थक्क झालेत.

कपिलचं पुन्हा एकदा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

कॉमेडियन कपिल शर्माला त्याच्या शोमध्ये अनेकदा सेलिब्रिटींकडून आणि इतरांकडूनही त्याच्या वजनाबद्दल टोमणे ऐकायला मिळाले आहेत. कपिलने गेल्या काही वर्षात स्वतःमध्ये जबरदस्त बदल करुन सर्वांची बोलती बंद केलीय. परंतु कपिलचा हा नवीन व्हिडीओ समोर आल्याने त्याच्या चाहत्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले आहेत. कपिलने नुकतीच राजा भोज यांनी निर्माण केलेल्या भोजपुर शिव मंदिरला भेट दिली.




कपिल शर्माचा हा व्हिडीओ पाहून लोकांचं सर्व लक्ष कपिलच्या तब्येतीकडे गेलं. कपिल प्रचंड बारीक झालेला दिसतोय. कपिल त्याच्या आगामी 'किस किस को प्यार करु' या सिनेमाच्या सीक्वलचं शूटिंग करतोय. या सिनेमामुळे कपिलन हे वजन घटवलं असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अचानक कपिल कसा बारीक झालाय? तो आजारी तर नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडलाय. हे प्रश्न पडण्यापेक्षा सर्वांनीच सेलिब्रिटींप्रमाणे स्वतःची तब्येत आणि आरोग्य नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणं कधीही चांगलं.

Web Title: comedian kapil sharma weight lose transformation video at shiv mandir bhojpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.