राजू श्रीवास्तव यांच्यानंतर आणखी एका विनोदवीराचे निधन, सुनील पालने शेअर केला व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 13:55 IST2022-10-05T13:53:23+5:302022-10-05T13:55:31+5:30
Comedian Parag Kansara Died: कॉमेडियन पराग कनसारा 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या पहिल्या सीझनमध्ये होते.

राजू श्रीवास्तव यांच्यानंतर आणखी एका विनोदवीराचे निधन, सुनील पालने शेअर केला व्हिडिओ...
Comedian Parag Kansara Died: टीव्ही इंडस्ट्रीतून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. दिग्गज कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यानंतर आणखी एका कॉमेडियनने जगाचा निरोप घेतला आहे. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या (Great Indian Laughter Challenge) पहिल्या सीझनमधील स्पर्धक पराग कंसारा (Parag Kansara) यांचे निधन झाले आहे. कॉमेडियन सुनील पालने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली.
परागची आठवणीने सुनील भावूक
सुनील पालने पराग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत सुनील भावूक दिसत आहे. सीनील पाल म्हणाला की, 'नमस्कार मित्रांनो, कॉमेडी क्षेत्रातून आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. आमचे लाफ्टर चॅलेंज पार्टनर पराग कंसारा जी आता या जगात नाहीत. ते नेहमी आम्हाला हसवायचा, पण आता पराग भैया या जगात नाहीत. कॉमेडीच्या क्षेत्राला कोणीची दृष्ट लागलीये, माहित नाही. काही दिवसांपूर्वीच आम्ही राजूभाईला गमावले.' सुनील पालने या व्हिडिओमध्ये दीपेश भानचीही आठवण केली.
पराग कंसारा गुजरातचे रहिवासी होते
पराग हे गुजरातमधील वडोदरा येथील रहिवासी होते. ते बऱ्याच काळापासून टीव्ही आणि कॉमेडी शोपासून दूर होते. पराग टीव्हीच्या सुपरहिट कॉमेडी रिअॅलिटी शो 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मध्ये स्पर्धक म्हणून दिसले होते. हा शो भारतीय टेलिव्हिजनचा पहिला शो होता, ज्याने स्टँडअप कॉमेडियन्सना एक मोठे व्यासपीठ देण्याचे काम केले. याशिवाय ते 'कॉमेडी का किंग कौन' मध्येही दिसले आहेत.