'कमांडो ३' चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर करू शकतो ५ कोटींची कमाई?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 18:58 IST2019-11-29T18:58:28+5:302019-11-29T18:58:54+5:30
विद्युत जामवालचा 'कमांडो ३' चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'कमांडो ३' चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर करू शकतो ५ कोटींची कमाई?
बॉलिवूडचा कमांडो म्हणजेच अभिनेता विद्युत जामवालचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'कमांडो ३' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ५ कोटींहून जास्त कमाई करू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कमांडो ३ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी जवळपास ५ कोटींहून जास्त कमाई करू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. संध्याकाळच्या शोजला चांगला प्रतिसाद असून संपूर्ण देशात यात वाढ होताना पहायला मिळते आहे.
या चित्रपटाबद्दल विपुल शाह यांनी सांगितले होते की, कमांडो ३ या चित्रपटाची कथा खूपच चांगली असून हा चित्रपट केवळ ॲक्शन थ्रिलर चित्रपट नाहीये तर एका माणसाची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आपण सगळे एकत्र असून आपल्या सगळ्यांमध्ये एकच कमांडो आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे करत आहोत. आपल्या देशात कोणतीही समस्या आली तर प्रत्येकजण एकमेकांना मदत करतो. प्रत्येक व्यक्तीत असलेल्या कमांडोला कमांडो हा चित्रपट सलाम करतो.
'कमांडो ३' हा चित्रपट कमांडो चित्रपटाची तिसरी फ्रंचाइजी आहे. यात विद्युतसोबत अदा शर्मादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर गुलशन देवैया यात निगेटिव्ह भूमिका करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्तने केले असून या चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शहा हे आहेत.